चॅलेंज! फोटोत 35 च्या गर्दीत लपवलेला 53 हा नंबर शोधून दाखवा, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:18 IST2024-12-09T16:11:59+5:302024-12-09T16:18:41+5:30

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंद्वारे आपलं मनोरंजन तर होतंच, सोबतच डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरतही होते.

Optical Illusion : Can you find 53 out of 35 in 12 seconds | चॅलेंज! फोटोत 35 च्या गर्दीत लपवलेला 53 हा नंबर शोधून दाखवा, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल!

चॅलेंज! फोटोत 35 च्या गर्दीत लपवलेला 53 हा नंबर शोधून दाखवा, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे ते लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. कधी यांमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात तर कधी यांमध्ये वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधून काढायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंद्वारे आपलं मनोरंजन तर होतंच, सोबतच डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरतही होते. त्यामुळे हे फोटो अधिक फायदेशीर ठरतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत सगळीकडे तुम्हाला 35 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ हाच नाही तर एक वेगळा नंबरही आहे. तो म्हणजे 53. जो तुम्हाला 12 सेकंदात शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोरच असूनही लगेच दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. अनेकदा एकसारख्या दिसणाऱ्या खूपसाऱ्या गोष्टी एकत्र आल्या की, वेगळा गोष्टी दिसतच नाही. तेच काहीसं या फोटोबाबत आहे. पण जर तुमचे डोळे चांगले असतील आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता चांगली असेल तर तुम्ही नक्कीच यातील वेगळा नंबर लगेच शोधू शकाल.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 12 सेकंदात जर तुम्ही यातील वेगळा नंबर म्हणजे 53 हा नंबर शोधला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही तुम्हाला वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता.

वरच्या फोटोत यातील वेगळा नंबर सर्कल केलेला आहे. 
 

Web Title: Optical Illusion : Can you find 53 out of 35 in 12 seconds