जीनिअस असाल तर या फोटोतील 3 चष्मा नसलेले पांडा शोधा, 99 टक्के लोक झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 11:45 IST2024-05-01T11:45:23+5:302024-05-01T11:45:47+5:30

Optical Illusion : यातील वेगळेपण म्हणजे यात 3 पांडा असे आहेत ज्यांनी गॉगल लावलेले नाहीत. त्यांना शोधणं हेच तुमच्यासाठी चॅलेंज आहे. 

Optical Illusion : Can you find 3 pandas without sunglasses in photo 99 percent fail | जीनिअस असाल तर या फोटोतील 3 चष्मा नसलेले पांडा शोधा, 99 टक्के लोक झालेत फेल!

जीनिअस असाल तर या फोटोतील 3 चष्मा नसलेले पांडा शोधा, 99 टक्के लोक झालेत फेल!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे पझल्स आणि ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे सॉल्व करणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. कारण यातून टाइमपास तर होतोच सोबतच डोळे आणि मेंदुची टेस्टही होते. हेही कळतं की, तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात खूपसारे पांडा दिसत आहे आणि त्यांनी गॉगल लावले आहेत. पण यातील वेगळेपण म्हणजे यात 3 पांडा असे आहेत ज्यांनी गॉगल लावलेले नाहीत. त्यांना शोधणं हेच तुमच्यासाठी चॅलेंज आहे. 

हा मजेदार पझल फोटो dudolf.com ने शेयर केला आहे. हा फोटो तसा तर फारच सोपा वाटतो. पण असं अजिबात नाहीये. कारण गॉगल लावलेले पांडा आणि न लावलेले पांडा यांच्यात फरक करणं इतकंही सोपं नाही. त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फारच बारकाईने बघावा लागेल. त्याहून महत्वाचं म्हणजे यासाठी तुमचे डोळे खूप तीक्ष्ण असायला हवेत. तेव्हा हे चॅलेंज तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी यात काही वेगवेगळ्या गोष्टीही आहेत. काही पांडानी टोपीही घातली आहे. तर काहींनी टाय बांधली आहे. तर काही कोल्डड्रिंक पित आहेत.

सोशल मीडियावर अनेक यूजरनी यात गॉगल नसलेले पांडा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींनी हे चॅलेंज पूर्ण केलं, पण जास्तीत जास्त यूजर यात फेल झाले. जेव्हा एकसारख्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात तेव्हा कन्फ्यूजन होणं स्वाभाविक आहे. तेच या फोटोबाबत होतं. पण प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळत असतं.

या फोटोतील तीन वेगळे पांडा तुम्ही शोधले असतील तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील गॉगल नसलेले 3 पांडा दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते कुठे आहेत ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता. 

Web Title: Optical Illusion : Can you find 3 pandas without sunglasses in photo 99 percent fail