Optical Illusion : टेनिस खेळत असलेल्या मुलीच्या फोटोतील 3 फरक ओळखा, तेही फक्त 7 सेकंदात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:27 IST2025-10-06T14:12:50+5:302025-10-06T14:27:28+5:30
Optical Illusion : जीनिअस असाल किंवा आपली नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोत काय अंतर आहे हे तुम्ही 7 सेकंदात शोधू शकाल.

Optical Illusion : टेनिस खेळत असलेल्या मुलीच्या फोटोतील 3 फरक ओळखा, तेही फक्त 7 सेकंदात
Optical Illusion : सोशल मीडियावर मेंदूची कसरत करवणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो तुमचा मेंदूची परीक्षा तर घेतातच सोबतच मेंदू शार्पही करतात. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. जीनिअस असाल किंवा आपली नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोत काय अंतर आहे हे तुम्ही 7 सेकंदात शोधू शकाल. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमध्ये आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत.
हे दोन्ही फोटो दिसायला अगदी एकसारखे आहेत. दोन्हींमध्ये एक मुलगी टेनिस खेळताना दिसत आहे. तिच्या शूजचा रंग पिवळा आहे. गुलाबी रंगाची टीर्शट आहे. आकाशी रंगाचा स्कर्ट आहे. हातात जांभळ्या रंगाची रॅकेट आहे. तसेच हिरव्या रंगाचा बॉल, बॅकग्राउंडमध्ये नेट आणि हिरवीगार झाडी आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी बारकाईने बघून यातील फरक शोधायचा आहे.
तर तुमच्यासमोर असलेल्या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे होते. जर तुम्ही 7 सेकंदात ते शोधले असतील तर तुमचे डोळे खरंच खूप चांगले आहेत.
जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही या फोटोतील फरक बघू शकता. पहिला फरक मुलीच्या हातात आहे, दुसरा तिच्या टीर्शटच्या गळ्यात आहे आणि शेवटचा फरक तिच्या शूजमध्ये आहे.
वरच्या फोटोत यातील 3 फरक बघू शकता.