आग ओकणाऱ्या ड्रॅगनच्या दोन फोटोत आहेत ३ फरक, १० सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:06 IST2024-09-04T13:47:24+5:302024-09-04T14:06:09+5:30
Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.

आग ओकणाऱ्या ड्रॅगनच्या दोन फोटोत आहेत ३ फरक, १० सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सॉल्व करणं किंवा यातील गोष्टी शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील समोरच असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्हाला काही प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यात तुम्हाला वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक आग ओकणारा ड्रॅगन दिवसत आहे. दोन्ही ड्रॅगन सारखेच दिसतात. पण ते सारखे नाहीत. त्यांमध्ये तीन फरक आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात. ज्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच तुम्हाला यातील फरक लगेच दिसून येतील. फक्त तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल.
जर तुम्हाला १० सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोतील ३ फरक दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करत आहोत. खालच्या फोटोत ते फरक तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत फरक सर्कल केले आहेत.