चॅलेंज! 89 च्या गर्दीत लपला आहे 98 हा वेगळा नंबर, 10 सेकंदात शोधा आणि बना जीनिअस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:46 IST2025-10-25T17:45:26+5:302025-10-25T17:46:07+5:30
Optical Illusion : या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यातील गोष्टी शोधता शोधता मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

चॅलेंज! 89 च्या गर्दीत लपला आहे 98 हा वेगळा नंबर, 10 सेकंदात शोधा आणि बना जीनिअस
Optical Illusion : मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी शोधणं अनेकांना आवडतं. त्यामुळेच असे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यातील गोष्टी शोधता शोधता मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे काय तर या फोटोंमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला बारकाईने बघून डोकं लावून शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन फोटोंमधील फरक दाखवायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. या फोटोत आपल्याला सगळीकडे 89 हा नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबरही आहे. तो म्हणजे 98. जो आपल्याला 10 सेकंदात शोधायचा आहे.

फोटोत खूपसारे 89 नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबरही आहे. जो फारच हुशारीने लपवण्यात आला आहे. त्यामुळे तो सहज दिसणार नाही. अनेकांना वाटत असेल की, हे तर सोपं काम आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. कारण यातील वेगळा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यात तेल घालून बघावं लागणार आहे.

जर आपल्याला 10 सेकंदात या फोटोत वेगळा नंबर म्हणजेच 98 नंबर दिसला असेल तर आपण जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर नाराज होण्याचं कारणंही नाहीये. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

वरच्या फोटोत यातील वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.