Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 7 मनुष्य अन् एक मांजर, शोधले तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:37 IST2023-08-02T15:27:13+5:302023-08-02T15:37:38+5:30

Optical Illusion : हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केल्यावर लोक त्यांच्या मेंदूची टेस्ट घेत आहेत. तसं पाहिलं तर काही लोकांना लगेच या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसली.

Optical illusion : 7 humans and 1 cat is hidden in this picture if found you will be called genius | Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 7 मनुष्य अन् एक मांजर, शोधले तर ठराल जीनिअस!

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 7 मनुष्य अन् एक मांजर, शोधले तर ठराल जीनिअस!

Optical Illusion  :  सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. कारण यातून मनोरंजनही होतं आणि तुमच्या मेंदुची टेस्टही होते. सोबतच डोळ्यांची दृष्टीही समजून येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला 7 पुरूष आणि एक मांजर शोधायची आहे.

तुमच्या समोर जो फोटो आहे ते एक पेन्सिल ड्रॉइंग आहे. एका सोशल मीडिया यूजरने हा फोटो शेअर केला. त्याने लिहिलं की, जर तुम्हाला या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमचा मेंदू सतर्कपणे काम करतो. पण जर यात तुम्हाला दोन किंवा तीनच मनुष्य दिसत असतील तर मग चिंतेचा विषय आहे.

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केल्यावर लोक त्यांच्या मेंदूची टेस्ट घेत आहेत. तसं पाहिलं तर काही लोकांना लगेच या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसली, पण बऱ्याच लोकांना या अपयश आलं. तुमच्याकडे यातील मनुष्य आणि मांजर शोधण्यासाठी 10 सेकंदाची वेळ आहे. 

या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या. असे अनेक यूजर होते ज्यांना या फोटोत मनुष्य तर दिसले, पण मांजर दिसली नाही. तेच काही लोकांनी उंदीर दिसल्याचा दावा केला. काही लोक म्हणाले सात मनुष्य शोधणं सोपं काम होतं. बघा तुम्हाला किती दिसतात. जर तुम्हाला असूनही यातील 7 मनुष्य आणि एक मांजर दिसली नसेल तर उत्तर खालच्या फोटोत आहे.

Web Title: Optical illusion : 7 humans and 1 cat is hidden in this picture if found you will be called genius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.