Fractured Man Dance, Video: नादच खुळा! हाता-पायाला 'फ्रॅक्चर' तरीही मित्राच्या लग्नात केला भन्नाट डान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:51 IST2023-02-07T13:48:34+5:302023-02-07T13:51:28+5:30
डान्सचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

Fractured Man Dance, Video: नादच खुळा! हाता-पायाला 'फ्रॅक्चर' तरीही मित्राच्या लग्नात केला भन्नाट डान्स!
Fractured Man Dance, Viral Video: सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून युजर्स अवाक् होतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे. मित्र-मैत्रिणीच्या लग्नाची एक वेगळीच उत्सुकता प्रत्येकाला असते. काहीही झालं तरी लग्नाला पोहोचणं गरजेचं असतं, पण काही वेळा काही लोक नाईलाजास्तव लग्नाला पोहोचू शकत नाहीत. पण काही लोक असेही असतात जे काहीही करून लग्नाला जातात. मित्राच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच थक्क करेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका पायात आणि एका हाताला फ्रॅक्चर होऊनही आपल्या मित्राच्या लग्नात पोहोचतो आणि एका पायावर उड्या मारत डान्स करताना दिसतो. पाहा व्हिडीओ-
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका लग्नाच्या फंक्शनमध्ये अनेक लोक डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, एकाच्या हाताला स्प्लिंट आणि पाय फ्रॅक्चर असूनही, एक माणूस डान्स फ्लोअरवर फुल मूडमध्ये भोजपुरी गाण्यावर ठेका धरताना दिसतो. ती व्यक्ती उडी मारताना नाचताना दिसते. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावरच उरत नाही असे दिसते. मित्राच्या लग्नाच्या आनंदात एक व्यक्ती मित्रांसोबत फुल ऑन एन्जॉय करत असते. महत्त्वाचे म्हणजे, तो एका पायावर नाचताना दिसतो. व्हिडिओच्या शेवटी, तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती नृत्य करताना आपला तोल गमावते. तो पडणार असतो पण मागे उभे असलेले लोक त्याची काळजी घेतात.