लग्नादिवशी भावाने बहिणीला दिले मोठे सरप्राईज; वधूसह पाहुण्यांनाही अश्रू अनावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:47 IST2022-06-28T18:46:12+5:302022-06-28T18:47:01+5:30

Trending News: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच भावूक केले.

On the wedding day, brother gave his sister a big surprise; Tears came up in the eyes of the bride and guests | लग्नादिवशी भावाने बहिणीला दिले मोठे सरप्राईज; वधूसह पाहुण्यांनाही अश्रू अनावर...

लग्नादिवशी भावाने बहिणीला दिले मोठे सरप्राईज; वधूसह पाहुण्यांनाही अश्रू अनावर...

Father's Wax Statue: भावा-बहिणीचे नाते प्रेमाचे, आपुलकिचे आहे. आपण अनेकदा भावा-बहिणींना एकमेकांशी भांडताना पाहिले आहे. एकीकडे भाऊ-बहीण एकमेकांशी भाडतात तर दुसरीकडे त्यांचे एकमेकांवर प्रेमही असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भावाने बहिणीला तिच्या लग्नाच्या दिवशी एक अतिशय सुंदर भेट दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. लग्नात तिलाला आपल्या वडिलांची उणीव भासणार, हे तिच्या भावाला माहिती होतं. पण, त्याने ही उणीव दूर करण्यासाठी वडिलांसारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार करुन घेतला. तो हुबेहूब त्यांच्या वडिलांप्रमाणे दिसत होता. हा पुतळा त्यांनी लग्नात आणला.

तरुणीला अश्रू अनावर
तरुणीने वडिलांचा पुतळा पाहताच ती भावूक झाली आणि रडू लागली. व्हिडिओमध्ये वधू आणि वधूच्या आईसह काही नातेवाईकांचे डोळेही ओलावल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वधूने वडिलांच्या पुतळ्याला मिठी मारली आणि चुंबनही घेतले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या सुंदर व्हिडिओने अनेकांची मने जिंकली. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

Web Title: On the wedding day, brother gave his sister a big surprise; Tears came up in the eyes of the bride and guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.