VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:41 PM2021-07-23T14:41:23+5:302021-07-23T14:42:10+5:30

व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, इथे वॅक्सीन घेण्यासाठी महिलांची मोठी लाइन लागली आहे. यादरम्यान आधी वॅक्सीन घेण्यावरून महिलांमध्ये हाणामारी झाली.

OMG : Women fight with each other for the vaccination in Khargone Madhya Pradesh | VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

Next

मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात कोविडच्या लसीकरणावरून लोकांमध्ये जबरदस्त मारामारी होत आहे. लसीकरणासाठी लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  या गर्दीमुळे प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. एका गावातील लसीकरण केंद्रावर महिला आपसात भिडल्या आणि एकमेकींना हाणामारी केली.

कसरावद तहसीलच्य खलबुजुर्ग गावातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, इथे वॅक्सीन घेण्यासाठी महिलांची मोठी लाइन लागली आहे. यादरम्यान आधी वॅक्सीन घेण्यावरून महिलांमध्ये हाणामारी झाली. आधी बाचाबाची सुरू होती नंतर थेट त्या एकमेकींना मारहाण करू लागल्या. महिला एकमेकींचे केस ओढू लागल्या. तर एक महिलेला केसांनी ओढून खाली पाडण्यातही आलं.

अशात तिथे उपस्थित असलेल्या काही पुरूषांनी महिलांचं भांडण सोवडवण्याचा प्रयत्न केला. पण भांडण सोडवता सोडवता तेही दमफूस झाले. तेच लोक म्हणाले की, आरोग्य विभागात कोणतीही व्यवस्था नव्हती. ज्यामुळे महिलांमध्ये हे भांडण झालं. जसजशी गर्दी वाढली गोंधळ आणखीन वाढत गेला. ज्यांना संधी मिळाली ते सेंटरच्या आत घुसले.

अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच घडली असं नाही. याआधीही मध्य प्रदेशच्या धारमध्ये एका वॅक्सीनेशन सेंटरवर लोकांच्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला होता. या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात लोक इकडे तिकडे पळताना दिसत होते.  अशाप्रकारच्या गर्दी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडत आहे.
 

Web Title: OMG : Women fight with each other for the vaccination in Khargone Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.