युट्यूबर अरमान मलिक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. दोन बायका असलेला आणि एकाच छताखाली राहणारा आणि स्वतःला हिंदू म्हणवणारा अरमान मलिक कायदेशीर अडचणीत सापडला आहे. १४ वर्षांत दोनदा लग्न करणारा अरमान मलिक याला त्याच्या दोन्ही बायकांसह पटियाला जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. याअंतर्गत अरमानला २ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
देविंदर राजपूत नावाच्या व्यक्तीने अरमान मलिकविरुद्ध याचिका दाखल केली आहे. 'अरमानने दोन नाही तर चार वेळा लग्न केल्याचा दावा त्याने केला आहे. हे हिंदू विवाह कायद्याच्या विरुद्ध आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, कोणताही व्यक्ती फक्त एकदाच लग्न करू शकतो. यासोबतच, या याचिकेत अरमान आणि पायल मलिकवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 'पायलने हिंदू देवी कालीच्या रूपात एक व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या. तसेच, हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचा दावाही यात केला.
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
नेटकऱ्यांनी केल्या टीका
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी टीका केल्या आहेत. यानंतर २२ जुलै रोजी त्यांनी पटियालामधील मध्ये काली माता मंदिरात गेले होते आणि तेथेच त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. यानंतर २२ जुलै रोजी मोहाली येथील खरार येथील काली मंदिरात गेले तिथे त्यांना दंडही झाला.यामध्ये पायलला सात दिवस मंदिर साफ करायला लागले होते.
पायल मलिकने शिक्षा भोगली होती
देवी कालीच्या वादानंतर, पायल आणि अरमाननेही शिक्षा भोगली होती. त्यांनी सर्वांची माफी मागितली होती. आणि सांगितले होते की त्यांनी हे फक्त त्यांच्या मुलीसाठी केले आहे. त्यांचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. २२ जुलै रोजी ते पटियाला येथील काली माता मंदिरात गेले आणि प्रार्थना केली. ते हरिद्वारला गेले होते आणि निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांची माफी मागितली होती. यादरम्यान, पायलची प्रकृतीही बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखलही करण्यात आले.