आजोबांच्या डान्स मु्व्ह्स बघुन नेटिझन्सही झाले वेडे, गाजवली लग्नाची वरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 22:04 IST2021-07-08T22:03:00+5:302021-07-08T22:04:21+5:30
लग्नाच्या वरातीत केला जाणारा डान्स म्हणजे फक्त धमाल. अनेकांच्या अंगातील कला नकला यावेळी डान्स फ्लोरवर बाहेर येतात. आता यात फक्त तरुणमंडळीच का? तर म्हातारेही पुढे आले आहेत. एका लग्नात डीचेच्या तालावर एका आजोबांनी असा काही डान्स केला की इंटरनेटवर त्यांचे चाहते झाले.

आजोबांच्या डान्स मु्व्ह्स बघुन नेटिझन्सही झाले वेडे, गाजवली लग्नाची वरात
लग्नाच्या वरातीत केला जाणारा डान्स म्हणजे फक्त धमाल. अनेकांच्या अंगातील कला नकला यावेळी डान्स फ्लोरवर बाहेर येतात. आता यात फक्त तरुणमंडळीच का? तर म्हातारेही पुढे आले आहेत. एका लग्नात डीचेच्या तालावर एका आजोबांनी असा काही डान्स केला की इंटरनेटवर त्यांचे चाहते झाले. त्यांच्या डान्स मुव्ह्स बघुन तुम्हालाही डान्स करणं आवरणार नाही. त्यांचा व्हिडिओ एकाने काढला आणि सोशल मिडिया साईटवर पोस्ट केला. पोस्ट केल्या केल्या त्याला नेटीझन्सनी डोक्यावर घेतलं.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघु शकता की या आजोबांनी डिजेच्या तालावर आपल्या स्टाईलमध्ये असे काय लटके झटके लावले की सर्वजण त्यांना बघत बसले. हा व्हिडिओबघुन तुमचा मुड रिफ्रेश होऊन जाईल. याला ४० हजाराच्या वर लाईक्स मिळाले.