Video : ...म्हणून लग्नात नेव्ही ऑफिसर पत्नीचं नाव घेऊन करू लागला पुश-अप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 13:57 IST2019-09-02T13:45:41+5:302019-09-02T13:57:11+5:30

सोशल मीडियात लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत राहतात. कधी लग्नाचे डान्स व्हिडीओ होतात तर कधी लग्नातील नवरी-नवरदेवाच्या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होतात.

Navy officer made to do push-up in his wedding video goes viral | Video : ...म्हणून लग्नात नेव्ही ऑफिसर पत्नीचं नाव घेऊन करू लागला पुश-अप्स!

Video : ...म्हणून लग्नात नेव्ही ऑफिसर पत्नीचं नाव घेऊन करू लागला पुश-अप्स!

सोशल मीडियात लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी लग्नातील डान्स तर कधी लग्नातील नवरी-नवरदेवाच्या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक लग्नातील वेगळा आणि मजेदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

तुम्हाला माहीत आहेच की, लग्नाता नवरदेवाचे मित्र कसे वेगवेगळे कारनामे करत राहतात. असाच एका लग्नातील हा कारनामा आहे. या लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी नवरदेवाकडे अशी काही मागणी केली की, तुम्ही पाहून थक्क व्हाल. हा व्हिडीओ तिरूवनंतपुरममधील एका नेव्ही ऑफिसरच्या लग्नातील आहे.

भारतीय नेव्हीच्या ऑफिसरने लग्नात मित्रांच्या सांगण्यावरून चक्क पुश-अप्स काढण्यासारखे टास्क केले. मजेदार बाब म्हणजे प्रत्येक पुश-अपवेळी नवरदेव नवरीचं नाव जोर-जोरात घेत होता. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओत पुश-अप करताना नवरदेव पत्नीचं नाव घेत 'आय लव्ह यू एलेना' असं म्हणत आहे. 

तसेच या व्हिडीओत कपल नेव्हीच्या साथीदारांकडून सलामी घेताना दिसत आहे. त्यानंतर कपल चर्चमधून बाहेर पडताना ऑफिसर्सच्या तलवारींच्या खालून जातं. तसेच नंतर नवरदेवाला २० हाय जंपही कराव्या लागल्या आणि दोघांनाही एकमेकांना किस करावं लागलं.

Web Title: Navy officer made to do push-up in his wedding video goes viral