Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:59 IST2025-12-13T08:58:35+5:302025-12-13T08:59:06+5:30

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमधून प्रवास करताना एका जोडप्याने दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mumbai Local Shock: Young Couple Creates Ruckus in Reserved Coach for Disabled Passengers; Commuters Outraged | Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल ट्रेन पुन्हा एकदा गैरवर्तनाच्या घटनेमुळे चर्चेत आली. बुधवारी सकाळी (१० डिसेंबर २०२५) डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जलद लोकल ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात एका जोडप्याने मोठा गोंधळ घातला आणि दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८:३९ वाजता ही घटना घडली. दिव्यांग डबा केवळ दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असतानाही, एका जोडप्याने बेकायदेशीरपणे डब्यात प्रवेश केला. इतकेच नाही, तर डब्यात उपस्थित असलेल्या दिव्यांग प्रवाशांशी त्यांनी गैरवर्तन केले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असेही सांगण्यात आले. डब्यातील इतर प्रवाशांनी जोडप्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि त्यांचा गोंधळ सुरूच ठेवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


नेटकऱ्यांमध्ये संताप

या व्हिडिओमुळे लोकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. विशेषतः दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांवर अतिक्रमण करून, त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या या जोडप्याच्या वर्तनाचा नागरिक एका सुरात निषेध करत आहेत. अशाप्रकारे राखीव डब्यांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी

"लोकलमध्ये प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन आणि गैरवर्तनाच्या घटना वारंवार घडत आहेत. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे," अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title : मुंबई लोकल: जोड़े की दादागिरी, दिव्यांग यात्रियों से दुर्व्यवहार; वीडियो वायरल

Web Summary : मुंबई लोकल में एक जोड़े ने दिव्यांग डिब्बे में घुसकर यात्रियों से दुर्व्यवहार किया, जिससे आक्रोश फैल गया। वीडियो वायरल होने पर सख्त कार्रवाई की मांग उठी।

Web Title : Mumbai Local: Couple's Bullying, Abuse of Disabled Passengers; Video Viral

Web Summary : A couple illegally entered a Mumbai local's disabled compartment, verbally abused passengers, sparking outrage. Demands for strict action rise as the video goes viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.