Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 21:32 IST2025-12-30T21:30:07+5:302025-12-30T21:32:37+5:30
Viral Video: कॅब चालकासोबत चुकीचे वर्तन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
सध्या सोशल मीडियावर एका हाय-व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका कॅब चालकाने भाड्याचे पैसे मागितले असता, महिला प्रवाशाने केवळ पैसे देण्यास नकारच दिला नाही, तर चालकाशी अत्यंत उद्धटपणे वर्तन केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत एका दुचाकीस्वाराने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वाद अधिकच चिघळला. परंतु, हा प्रकार नेमका कुठे आणि कधी घडला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने कॅबने प्रवास करूनही चालकाला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद पेटला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी वेगाने चालताना दिसत आहे आणि कॅब चालक तिच्या मागे धावत आहे. मॅडम टॅक्सी भाड्याचे पैसे द्या, असे करू नका, अशी विनंती करत आहे. मात्र, संबधित तरुणी अत्यंत अर्वाच्य भाषेत, चल जा, कसले पैसे? असे म्हणत आहे.
कॅब चालक आणि तरुणीमधील वाद विकोपाला जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कॅब चालकाने आपली व्यथा मांडली. तो म्हणाला की, या तरुणीने केवळ माझे पैसे बुडवले नाहीत तर, कारमध्ये बसून सिगारेट ओढली आणि दारू खरेदी करण्यासाठी माझा अर्धातास वाया घालवला. पुढे तो म्हणाला की, "ही तरुणी सहानुभूती मिळवण्यासाठी वूमन कार्ड वापरत आहे. चालकाचे कष्ट समजून घेतले पाहिजे." दरम्यान, जवळपास ३ ते ४ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. मात्र, अखेरीस त्या तरुणीने कॅब चालकाला पैसे दिले की नाही? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या तरुणीच्या वागणुकीचा तीव्र निषेध केला आहे. "कष्टकरी टॅक्सी चालकाची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटते," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर, अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करून अशा उद्धट प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.