शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

MS Dhoni New Car Video: धोनीची नव्या कारमधून ऋतुराज गायकवाड, केदार जाधवसोबत 'लाँग ड्राईव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:54 IST

धोनी स्पोर्ट्स बाईक आणि आलिशान कारचा प्रचंड मोठा चाहता आहे

MS Dhoni New Car Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानापासून दूर असला तरी त्याचे फोटो -व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचे कारण म्हणजे त्याचा मोठा चाहता वर्ग. धोनीने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. दरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो नवीन कार चालवताना दिसत आहे. Ruturaj Gaikwad आणि Kedar Jadhav या दोन भारतीय क्रिकेटपटूंसोबत तो वेगवान सफरीला निघल्याचा हा व्हिडीओ आहे.

धोनीने खरेदी केली नवी कार

धोनी निवृत्तीनंतर आपले आयुष्य अतिशय मजेत जगत आहे. कधी तो एखाद्या इव्हेंटमध्ये दिसतो, कधी त्याच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत असतो, कधी टेनिस मॅच बघताना तर कधी टेनिस खेळतानाही दिसतो. धोनीच्या चाहत्यांना त्याची प्रत्येक स्टाईल आवडते. त्याला बाईक रायडिंग आणि महागड्या कार्सची आवड आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याने नुकतीच नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 खरेदी केली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की धोनी त्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंसोबत गाडीच्या गेटवर उभा आहे. त्याच्यासोबत केदार जाधव आणि युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंनी धोनीसोबत नवीन कारमध्ये फिरण्याचा आनंद लुटला. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. रांचीच्या रस्त्यावर फिरतनाचा हा व्हिडीओ आहे.

धोनी हा 3 ICC ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार

धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठे टप्पे गाठले आणि देशवासियांना सेलिब्रेशनच्या अनेक संधी दिल्या. 3 ICC ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. टीम इंडियाने 2007 मध्‍ये टी-20 विश्‍वचषक, 2011 मध्‍ये एकदिवसीय विश्‍वचषक आणि 2013 मध्‍ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याने आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय सामने आणि 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 17,000 हून अधिक धावा केल्या.

 

टॅग्स :cricket off the fieldऑफ द फिल्डMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीKedar Jadhavकेदार जाधवRuturaj Gaikwadऋतुराज गायकवाड