VIDEO : अचानक कोसळला डोंगर, खाली सापडला अब्जो रूपयांचा खजिना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:04 IST2024-11-20T14:53:35+5:302024-11-20T15:04:40+5:30
Viral Video : हा व्हिडीओडेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या कटंगा क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे ही धक्कादायक दुर्घटना घडली तर दुसरीकडे या देशाचं नशीबही चमकलं.

VIDEO : अचानक कोसळला डोंगर, खाली सापडला अब्जो रूपयांचा खजिना!
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून लोक अवाक् झाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत बघू शकता की, एक डोंगराचा एक मोठा भाग तुटून खाली कोसळला आहे. तर आजूबाजूला असलेले लोक आरडाओरड करत आहेत. हा व्हिडीओडेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या कटंगा क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे ही धक्कादायक दुर्घटना घडली तर दुसरीकडे या देशाचं नशीबही चमकलं.
अल जजीराच्या वृत्तानुसार, डीआर कांगोच्या खनिज समृद्ध क्षेत्रात अचानक एक डोंगर खाली कोसळला. व्हायरल व्हिडिओत शेकडो लोकही दिसत आहेत. डोंगर खाली कोसळताच लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
Massive quantities of copper unearthed after mountain collapse in Katanga pic.twitter.com/HlWQiCIBAK
— curious side of 𝕏 (@curioXities) November 17, 2024
असं सांगण्यात येत आहे की, या दुर्घटनेमुळे देशाचं नशीब चमकलं आहे. एक्सपर्टनुसार, डोंगर कोसळल्याने इथे मोठ्या प्रमाणात तांबे बाहेर आलं आहे. जो लुटण्यासाठी इथे लोकांनी गर्दी केली आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आफ्रिकेतील गरीबीच्या समस्येवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
तांबे कांगो गणराज्यातील सगळ्यात मौल्यवान नॅचरल खनिजांपैकी एक आहे. देशात तांब्याचा विशाल भांडार आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डीआर कांगो जगातील सगळ्यात मोठ्या तांबे भांडारांपैकी एक आहे. तसेच या भागात कोबाल्ट, यूरेनियम, टिन आणि जस्ताचाही भांडार आहे.