निर्दयी आईनं तीन वर्षांच्या मुलीला अस्वलासमोर फेकलं; धक्कादायक VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 10:04 IST2022-02-02T10:04:02+5:302022-02-02T10:04:22+5:30

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आईविरोधात गुन्हा दाखल; मुलीवर उपचार सुरू

mother throws her 3 year old girl in front of bear video goes viral | निर्दयी आईनं तीन वर्षांच्या मुलीला अस्वलासमोर फेकलं; धक्कादायक VIDEO व्हायरल

निर्दयी आईनं तीन वर्षांच्या मुलीला अस्वलासमोर फेकलं; धक्कादायक VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक निर्दयी आई तिच्या तीन वर्षीय मुलीला एका अस्वलासमोर फेकताना दिसत आहे. एका प्राणीसंग्रहालयात हा प्रकार घडला. महिलेनं तिच्या मुलीला अचानक अस्वलासमोर फेकलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. 

उझबेकिस्तानच्या प्राणीसंग्रहालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी आलेल्या एका आईनं तिच्या मुलीला अस्वलासमोर टाकलं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. महिलेनं तिच्या मुलीला अस्वलासमोर टाकताच तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेच धाव घेतली. सुदैवानं अस्वलानं लहान मुलीला कोणतीही इजा केली नाही. अस्वलाला एका भागात बंद करून कर्मचाऱ्यांनी मुलीला सुखरुप बाहेर आणलं. 

मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला थोडी दुखापत झाली आहे. मात्र दुखापतीचं स्वरुप गंभीर नाही. मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तिच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. महिलेनं जाणूनबुजून स्वत:च्या मुलीला अस्वलासमोर फेकल्याचं प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Web Title: mother throws her 3 year old girl in front of bear video goes viral