रस्ता पार करताना आपल्या पिल्लांची अशी काळजी घेतं अस्वल, व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:12 IST2024-05-10T14:11:52+5:302024-05-10T14:12:29+5:30
जूलीने आपल्या कारमधून हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. या व्हिडीओत एक अस्वल आणि तिचे पिल्लं एशविलेच्या जंगलात फिरताना दिसत आहेत.

रस्ता पार करताना आपल्या पिल्लांची अशी काळजी घेतं अस्वल, व्हिडीओ पाहून पडाल प्रेमात
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एक अस्वल आणि तिच्या पिल्लांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा लोकांना खूपच आवडला आहे. इंस्टाग्राम यूजर जूली बोगार्टने हा व्हिडीओ शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडीओला 25 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
जूलीने आपल्या कारमधून हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. या व्हिडीओत एक अस्वल आणि तिचे पिल्लं एशविलेच्या जंगलात फिरताना दिसत आहेत. दूरूनच अस्वलाला बघून जूलीने आपली कार थांबवली आणि त्यांना आरामात रस्ता पार करू दिला. अस्वलानेही कार थांबल्यावर आधी इकडे-तिकडे बघून सेफ असल्याची खात्री करून घेतली. तेव्हाच रस्ता पार केला. यातून अस्वल आपल्या पिल्लांची कशी काळजी घेते हे दिसून आलं.
लोकांना अस्वलाचा हा व्हिडीओ इतका आवडला की, ते पुन्हा पुन्हा बघत आहेत. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, मी हा व्हिडीओ सतत 20 वेळा पाहिला. खूपच भारी आहे. दरम्यान याआधी आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनीही 9 मे रोजी एका पोस्टमध्ये हिमालयातील अस्वलाचा आणि त्याच्या पिल्लांचा झाडावर चढतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.