माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:55 PM2020-08-09T16:55:54+5:302020-08-09T17:01:06+5:30

माकडाच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. 

Monkey unboxes a water bottle gift pack video goes viral on social media | माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ

माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ

Next

एका माकडाचा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तुम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान प्राण्यांचे अनेक गमतीदार व्हिडीओ पाहिले असतील. या व्हिडीओमध्ये माकडाचा खोडकरपणा आणि हूशारी तुम्हाला दिसून येणार आहे. माकडाच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल. 

या व्हिडीओमध्ये माकडाला एक माणूस भेटवस्तू देतो. ही भेटवस्तू पाहून माकड खूश होतं आणि ते काय आहे याची उत्सुकता म्हणून उघडून बघतो. या पॅकच्या आत पाण्याची बाटली असते. आधी ती बाटली उघडून माकड बघतो.  त्यानंतर बाटलीचा वास घेतो आणि झाकण लावून पुन्हा ठेवतो. सगळ्यात विनोदी प्रकार म्हणजे त्यानंतर  बाटलीसोबत आलेलं ब्रोशर माकड वाचतो. एखाद्या शहाण्या माणसाने वाचावं तशाचप्रकार माकडे हे ब्रोशर वाचत आहे.

या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 1.1 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. साडेसात हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.  समजदार माकड असल्याची कमेंट एका सोशल मीडिया युजरनं केली आहे.

हे पण वाचा-

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

Web Title: Monkey unboxes a water bottle gift pack video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.