Viral Video: माकडाने न्हाव्याकडून करून घेतली दाढी, व्हिडीओ बघून म्हणाल - वाह रे वाह....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 14:36 IST2022-01-25T14:22:07+5:302022-01-25T14:36:55+5:30
Monkey Shaving Video : हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि पोट धरून हसाल सुद्धा. या व्हिडीओत एक माकड दाढी करत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत आणि अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.

Viral Video: माकडाने न्हाव्याकडून करून घेतली दाढी, व्हिडीओ बघून म्हणाल - वाह रे वाह....
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ फारच क्यूट असतात जे पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा होते. तर काही व्हिडीओ पाट धरून हसायला भाग पाडतात. अशातच आता माकडाला एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि पोट धरून हसाल सुद्धा. या व्हिडीओत एक माकड दाढी करत (Monkey Shaving Video) आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत आणि अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.
आतापर्यंत तुम्ही पुरूषांना न्हाव्याकडून दाढी करून घेताना पाहिलं असेल. पण जर तुम्हाला विचारलं की, तुम्ही कधी माकडाला दाढी करताना पाहिलं का? तर सगळेच नाही असंच म्हणतील. व्हायरल व्हिडीओमध्ये बघू शकता की, एक माकड एका दगडावर आरामात बसलं आहे आणि एक न्हावी त्याची वस्तऱ्याने त्याची दाढी करून देत आहे. बघून तर असंच वाटतं की, एक मनुष्य दाढी करतो आहे. (हे पण वाचा : नोटांवर असणाऱ्या तिरप्या रेषांचा अर्थ जाणून घ्या, खूप कामी येईल!)
हा व्हिडीओ पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. विचारात पडले आहेत की, माकड कसं दाढी करत आहे? या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ 'Saikat & Satabdi' नावाच्या फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या मजेदार व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर सात हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. तर अनेकजण मजेदरा कमेंट्सही करत आहेत.