शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये माकडाची दहशत; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये पिकला हशा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 12:12 IST

एका माकडाने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस क्षणार्धात केली रिकामी.

Viral Video: हल्ली आपल्याला अनेक ठिकाणी माकडे आढळतात. कधी शहरी भागात तर कधी भरवस्तीत ही माकडे अगदी सर्सास वावरताना दिसतात. बऱ्याचदा तर ही माकडे त्यांच्या हरकतीने माणसाला सळो की पळो करून सोडतात. अशाच एका माकडाने धिंगाणा घातल्याचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लखनौमध्ये चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये माकडाने हैदोस घातल्याचे पाहायला मिळाले. या माकडाची 'पॉवर' इतकी की प्रवाशांनी भरलेली बस रिकामी करण्याची वेळ आली.  उत्तरप्रदेशातील दुबग्गा सीतापूर बायपास मार्गावरून ही बस जात असताना या बसमध्ये जंगली माकडाने शिरकाव केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. एक आश्चर्याची बाब म्हणजे ज्या क्षणी माकडाने बसमध्ये एंट्री केली त्या वेळी बस कंडक्टरनेच सर्वात आधी पळ काढल्याचे दिसत आहे. पण इतर प्रवासी माकड बाहेर जाण्याची वाट पाहत बसमध्येच बसून राहतात.  बसस्थानकावर प्रवासी बसमध्ये चढताना अचानक या माकडाने बसमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्याने बसमध्ये हैदोस घातला. कधी बसच्या सीटवर बसून तर कधी प्रवाशांना त्रास देऊन या माकडाने बसमधील प्रत्येकाच्या नाकी नऊ आणले.  त्यामुळे या माकडाच्या त्रासाला कंटाळून प्रवासी अखेर बसमधून खाली उतरले. लखनौमधील बसमधील हा मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते आहे. 

बसमध्ये माकडामुळे निर्माण झालेल्या दहशतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय नेटकऱ्यांच्या या मजेशीर व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स देखील येत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशTwitterट्विटर