अचानक आकाशातून पडू लागला नोटांचा 'पाऊस', गोळा करण्यासाठी लोकांची तौबा गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:20 IST2025-01-08T11:16:28+5:302025-01-08T11:20:24+5:30

Viral Video : नोटांचा 'पाऊस' पाहून लोकांची चांगली मजा झाली. हा व्हिडीओ पाहून यूजर्सही हैराण झाले आहेत.

money raining from the sky stampede to loot viral video | अचानक आकाशातून पडू लागला नोटांचा 'पाऊस', गोळा करण्यासाठी लोकांची तौबा गर्दी!

अचानक आकाशातून पडू लागला नोटांचा 'पाऊस', गोळा करण्यासाठी लोकांची तौबा गर्दी!

Money viral video: वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये नोटांचा 'पाऊस' पाडल्याचे आणि ते घेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर असंच वाटतं की, आकाशातून पैशांचा 'पाऊस' पडत आहे. पण नंतर दिसतं की, हा नोटांचा 'पाऊस' वरातीलमध्ये पाडला जात आहे आणि लोकांनी पैसे उचलण्यासाठी एकच गर्दी केली आहे. 

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ @jaanshine112233 वर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण नोटांचा 'पाऊस' पाहून लोकांची चांगली मजा झाली. हा व्हिडीओ पाहून यूजर्सही हैराण झाले आहेत.

व्हिडिओत रस्त्यावर वरात जाताना दिसत आहे. वरातीमधील काही लोक हवेत नोटा फेकत आहेत आणि इतर लोक पैसे गोळा करत आहेत. नीट बघितलं तर बाजूला उभे असलेले काही तरूण हवेत पैसे फेकताना दिसत आहेत. या नोटा १०-२० रूपयांच्या असल्याचं दिसत आहे. 

या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ८६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहे. एकानं लिहिलं की, 'जर इतका पैसा आहे, तर गरीबांमध्ये वाटला पाहिजे. असेच उडवण्यात काय अर्थ आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, '१० रूपयांची नोटा उडवून स्वत:ला श्रीमंत समजत आहे'. जास्तीत जास्त लोकांना या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 

Web Title: money raining from the sky stampede to loot viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.