'चोरी किया रे जिया...' म्हणत मोनालिसानं फॅन्सना पुन्हा केलं घायाळ, स्टायलिश अंदाज कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:24 IST2025-02-26T15:54:09+5:302025-02-26T16:24:27+5:30
Monalisa New Reel : यात ती दबंग सिनेमातील 'चोरी किया रे जिया' गाण्यावर काही हावभाव देताना दिसत आहे. या रीलला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

'चोरी किया रे जिया...' म्हणत मोनालिसानं फॅन्सना पुन्हा केलं घायाळ, स्टायलिश अंदाज कमाल!
Monalisa Reel On Bollywood Song: महाकुंभमधून फेमस झालेल्या मोनालिसाची सोशल मीडियावर तेव्हा चांगलीच चर्चा झाली. मोनालिसाचं नॅचरल सौंदर्य लोकांना इतकं भावलं की, पाहता पाहता लाखो लोक तिचे फॅन झाले. लोकांची तिच्याबाबत क्रेझ बघता तिला सिनेमा सुद्धा ऑफर झाला. त्यानंतर मोनालिसाचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सध्या तिच्या एका व्हिडिओनं फॅन्सचं लक्ष वेधलं आहे. यात ती दबंग सिनेमातील 'चोरी किया रे जिया' गाण्यावर काही हावभाव देताना दिसत आहे. या रीलला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
मोनालिसा या व्हायरल व्हिडिओत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत सुंदर दिसत आहे. तिच्या हातात काही फुलं आहेत आणि स्टायलिश अंदाजात तिनं व्हिडीओ बनवला आहे. मोनालिसाचे हावभाव आणि लटक्या-झटक्यांनी तिचे फॅन्स घायाळ झाले आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सवर हा व्हिडीओ ट्रेंड करत आहे. तर लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहेत.
मोनालिसाचा हा रील व्हायरल होताच, फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'हावभाव खरंच खूप कमाल आहेत'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट रील'. लोकांच्या कमेंट्सवरून तरी असंच दिसतंय की, दिवसेंदिवस मोनालिसाची लोकप्रियता वाढतच चालली आहे.
मोनालिसा नावाची ही तरूणी महाकुंभ मेळ्यातून व्हायरल झाली होती. तिने अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. तिचा नॅचरल अंदाज आणि सुंदर डोळ्यांचे लोक फॅन झाले होते. आता मोनालिसा एका सिनेमाचं शूटींग करत आहेत. तर रील्स आणि शॉर्ट्सही शेअर करत असते.