Monalisa : कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:01 IST2025-01-22T11:01:14+5:302025-01-22T11:01:44+5:30

Monalisa : एका ब्युटी पार्लरमध्ये मोनालिसाचा मेकओव्हर करण्यात आला आहे. 'व्हायरल गर्ल'च्या मेकओव्हरचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Monalisa makeover video viral Mahakumbh viral girl | Monalisa : कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

Monalisa : कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील जगातील सर्वात मोठ्या महाकुंभमेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. तिचे डोळे खूप सुंदर असल्याचं म्हटलं जात आहे. महाकुंभातील या व्हायरल मुलीचे एकामागून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या मुलीचं नाव मोनालिसा आहे, जी मध्य प्रदेशातील इंदूर येथून तिच्या कुटुंबासह महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आली आहे. 

सुंदर डोळे असलेल्या मोनिलिसाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता पुन्हा एकदा तिची जोरदार चर्चा रंगली आहे. एका ब्युटी पार्लरमध्ये मोनालिसाचा मेकओव्हर करण्यात आला. 'व्हायरल गर्ल'च्या मेकओव्हरचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मेकअपनंतर मोनालिसाला ओळखणं अवघड झालं आहे. शिप्रा मेकओव्हर ब्युटी सलूनने तिचा मेकओव्हर केला.


 ब्युटी सलूनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मोनालिसाच्या मेकओव्हरचे एक नाही तर अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये प्रोफेशनल आर्टिस्ट तिचा मेकअप करताना दिसत आहेत. मोनालिसाच्या सर्व व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. आता मोनालिसाच्या मेकओव्हरवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक तिच्या मेकओव्हरचं कौतुक करत आहेत तर काही लोक कमेंट बॉक्समध्ये तिला ट्रोल करत आहेत.

काही युजर्सनी मोनालिसाची तुलना ही रानू मंडलसोबत केली आहे. आता तिची अवस्थाही रानू मंडलसारखी होईल असं म्हटलं आहे. तर काहींनी सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मुलीच्या मेकओव्हरचं कौतुक केलं आहे. आता हिला हिरोईन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. मोनालिसाचे अनेक व्हिडीओ आता फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. 


सुंदर डोळ्यांची मोनालिसा चित्रपटांत करणार काम; महाकुंभतील फोटो व्हायरल, आल्या ऑफर?

मोनालिसाच्या मुलाखती घेतल्या जाऊ लागल्या आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि एक्सवर वेगाने शेअर केले जाऊ लागले. मोनालिसाला कोणीतरी विचारलं की जर तिला बॉलिवूडमधून चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली तर काम करायला आवडेल का? यावर मोनालिसाने उत्तर दिलं की, तिला नक्कीच अभिनय करायला आवडेल. एबीपी न्यूजशी बोलताना मोनालिसाने सांगितलं होतं की, तिला ऐश्वर्या राय बच्चन सारखं चित्रपटांमध्ये यशस्वी व्हायचं आहे. 
 

Web Title: Monalisa makeover video viral Mahakumbh viral girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.