कपाळावर टिकली, कानात झुमके अन् नोजरिंग... शमीची पत्नी हसीन जहाँचा 'तो' फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 18:22 IST2024-01-31T18:18:20+5:302024-01-31T18:22:02+5:30
मोहम्मद शमीच्या पत्नीने त्याच्यावर आरोप केले होते तेव्हापासून ती चर्चेत आहे

कपाळावर टिकली, कानात झुमके अन् नोजरिंग... शमीची पत्नी हसीन जहाँचा 'तो' फोटो व्हायरल
Haseen Jahan - Mohammad Shami Viral Photo: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत तिच्या जीवनशैलीशी संबंधित अपडेट्स देत असते. हसीन जहाँ अनेक दिवसांपासून पती मोहम्मद शमीपासून वेगळी राहत आहे. हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगशिवाय घरगुती हिंसाचार, विवाहबाह्य संबंध असे गंभीर आरोप केले होते. यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि ते वेगळे राहिले. त्यांचा वाद न्यायालयात असतानाच हसीन जहाँने पोस्ट केलेल्या एका फोटो साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
बरेचदा मॉडर्न लूकमध्ये दिसणारी हसीन जहाँ फोटोमध्ये चक्क पारंपरिक लूक मध्ये दिसली. इतकेच नव्हे तर तिने तिच्या इंस्टाग्रामवर असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कपाळावर बिंदी आणि सिंदूर लावलेली दिसत आहे. तसेच तिने नोजरिंगही घातली आहे. सुरुवातीला हा फोटो पाहून तिने कुणाशी लग्न केले की काय, अशा चर्चा सोशल मीडियावर दिसल्या. पण नंतर तिनेच हा फोटो एका इव्हेंटमधला असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांच्यातील वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शमी दर महिन्याला पत्नी आणि मुलीला भरणपोषण भत्ता देत आहे. शमीची मुलगी तिच्या आईसोबत राहत असली तरी तो वेळोवेळी आपल्या मुलीला भेटायला येत असतो. शमीपासून विभक्त झाल्यानंतर हसीन जहाँ पुन्हा एकदा मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे.