शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता मिरचीपासून तयार केलं जातंय आईसक्रीम, रेसिपी पाहुन नेटकरी म्हणाले, आता जगबुडी नक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 17:42 IST

सध्या मिरचीपासून तयार केल्या जाणाऱ्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे.

आईस्क्रीम हा जवळपास प्रत्येकाचा विक (Ice cream weak point) पॉईंट असतो. आईस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणं फारच अवघड असतं. प्रत्येकाचा आवडणारा फ्लेवर आणि प्रकार (Flavor and style of ice cream) वेगवेगळा असतो. प्रत्येक दुकानातही वेगवेगळ्या पदधतीचं आणि स्टाईलचं आईस्क्रीम बनवलं जातं. काही ब्रँड्स हे फळांचे आईस्क्रीम बनवण्यासाठी (Fruit ice cream) प्रसिद्ध असतात, तर काहीजण फळ सोडून इतर फ्लेवर अधिक चांगलाच तयार करतात. मात्र सध्या मिरचीपासून तयार केल्या जाणाऱ्या आईस्क्रीमची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. खाल्ल्यावर मजा येणारं पण जोरदार झटका बसणारं हे आईस्क्रीम चर्चेचा विषय ठरत आहे.

मिरचीचं आईस्क्रीम कसं तयार करायचं, याची रेसिपी सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आईस्क्रीम तयार करणाऱ्यानं सुरुवातीला मिरचीचे काही तुकडे घेतले. त्यावर मग न्यूट्रेला टाकला. त्यानंतर क्रीम मिल्क टाकून सर्व मिश्रण एकत्र क्रश करून घेतलं. त्यानंतर फ्रीजरवर आईस्क्रीमला चांगल्या तऱ्हेनं क्रश करून त्याचा रोल तयार करण्यात आला. अशा प्रकारचे छोटे छोटे रोल त्याने तयार केले आणि एका प्लेटमधून सर्व्ह केले. त्यावर काहीसं सीरप आणि मिरचीचे टॉपिंग्ज टाकून ते सर्व्ह करण्यात आले.

या आईस्क्रीमला झन्नाट मिरची आईस्क्रीम रोल असं नाव देण्यात आलं आहे. जी व्यक्ती हे आईस्क्रीम खाईल, तिला जोरदार झटका बसेल आणि आईस्क्रीम खाण्याचा आनंदही लुटता येईल, असं शेफ सांगतो. आतापर्यंत अनेक प्रकारची आणि फ्लेवरची आईस्क्रीम पाहिली होती, मात्र मिरचीपासून तयार केलेलं हे आईस्क्रीम अनोखं असल्यामुळे त्याला युजर्सची जोरदार पसंती मिळत आहे.

हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून युजर्सनी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता मिरचीचं हेच होणं बाकी होतं, असं एकानं म्हटलं आहे. तर मिरचीपासून काय करावं, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभी करायला हवी, अशी प्रतिक्रिया दुसऱ्यानं दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाReceipeपाककृतीRecipeपाककृती