चमत्कार...! जेव्हा-जेव्हा गर्भवती महिला हनुमान चालीसा ऐकते, तेव्हा-तेव्हा बाळ पोटात पाय मारू लागते; बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:10 IST2025-01-18T13:08:59+5:302025-01-18T13:10:44+5:30
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे यात एक गर्भवती महिला तिच्या मोबाईल फोनवर जेव्हा हनुमान चालीसा वाजवते, तेव्हा तिच्या गर्भात वाढणारे बाळ पाय मारू लागते.

चमत्कार...! जेव्हा-जेव्हा गर्भवती महिला हनुमान चालीसा ऐकते, तेव्हा-तेव्हा बाळ पोटात पाय मारू लागते; बघा VIDEO
जेव्हा एखादी महिला गर्भवती असते, तेव्हा तिच्या गर्भात वाढणारे बाळ विविध प्रकारच्या लिला करत असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे यात एक गर्भवती महिला तिच्या मोबाईल फोनवर जेव्हा हनुमान चालीसा वाजवते, तेव्हा तिच्या गर्भात वाढणारे बाळ पाय मारू लागते. तसेच, याउलट ती जेव्हा बॉलिवूड गाणे वाजवते तेव्हा बाळाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
SunRaah नावाच्या इन्स्टा अकाउंटवर असलेला हा व्हिडिओ अनेक लोकांनी बघितला आहे. या व्हडिओवर इंस्टा युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. या व्हिडिओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज तर ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय, लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने, 'वाह! मुलाला योग्य मार्ग माहित आहे. हनुमानजी त्याला आशीर्वाद देवोत, असे लिहिले आहे. तर बहुतांश लोकांनी 'जय श्री राम' असे लिहिले आहे.
...अन् पोटातील बाळ पाय मारू लागते -
महत्वाचे म्हणजे, जेव्हा संबंधित महिला तिच्या फोनवर सर्वप्रथम 'स्त्री-२' मधील 'आज की रात' हे गाणे वाजवते. तेव्हा मूल कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. मात्र, यानंतर, जेव्हा हनुमान चालीसा वाजवली जाते, तेव्हा पोटातील बाळ पाय मारू लागते.