Miami zoo gorilla sign language viral video wins internet | VIDEO : खायला देणाऱ्याला गोरिलाने दिलं असं उत्तर; पाहणारेही झाले अवाक्
VIDEO : खायला देणाऱ्याला गोरिलाने दिलं असं उत्तर; पाहणारेही झाले अवाक्

सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या रिअॅक्शन्स देत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका गोरिलाचा आहे. अनेकदा सोशल मीडियावर गोरिलाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण या व्हिडीओमधील गोरिला भलताच हुशार असल्याचे दिसत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गोरिला हावभाव करत संवाद साधताना दिसत आहे. ही व्हिडीओ क्लिप मियामी प्राणी संग्रहालयातील आहे. लोक या गोरिला सर्वा समजूतदार असंही म्हणत आहेत. आता तुम्ही म्हणाल की, नक्की या गोरिलाने असं काय केलं आहे? 

पाहा व्हायरल व्हिडीओ : 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होणाऱ्या हा व्हिडीओ 2013 मध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. परंतु, आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

रिपोर्ट्सनुसार, प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी आलेला एक पर्यटक गोरिलाला काहीतरी खाण्यासाठी देत होता. गोरिलाने त्याला हावभाव करत उत्तर दिले. ट्विटरवर हा व्हिडीओ 3 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 4 हजार लाइक्स आणि 800 पेक्षा जास्त रि-ट्विट्स आले आहेत.

Web Title: Miami zoo gorilla sign language viral video wins internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.