VIDEO : जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर चढला 20 फूट लांब अजगर आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:26 IST2024-07-19T13:22:02+5:302024-07-19T13:26:51+5:30
जरा कल्पना करा की, तुम्ही झोपलेले आहात आणि एक 20 फूट लांब अजगर तुमच्या अंगावर चढत आहे. याच होईल हे तुम्हाला माहीत आहेच.

VIDEO : जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर चढला 20 फूट लांब अजगर आणि मग....
सापाचं नाव घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो. अशात जर समोर साप आला तर काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्यात जर एखादा भलामोठा म्हणजे 20 फुटाचा अजगर जर तुमच्या जवळ आला तर काय होईल. जरा कल्पना करा की, तुम्ही झोपलेले आहात आणि एक 20 फूट लांब अजगर तुमच्या अंगावर चढत आहे. याच होईल हे तुम्हाला माहीत आहेच. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा अजगराचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, एक व्यक्ती जमिनीवर झोपली आहे. तेव्हाच दरवाज्यातून एक लांबलचक अजगर रूममध्ये येतो. हा अजगर झोपलेल्या व्यक्तीच्या हातावर जातो. व्यक्ती इतकी गाढ झोपेत आहे की, त्याला याचा जराही अंदाज नाही. अजगर पुढे व्यक्तीच्या डोक्यावर जातो. तेव्हाच व्यक्तीची झोप उघडते आणि अजगराला पाहून घाबरून घरातून बाहेर धावत सुटते.
अजगराचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत इन्स्टावर 11 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 23 हजारांपेक्षा जास्त लोकांना व्हिडीओला लाइक केलं आहे आणि 14 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. लोक झोपताना जाग धरून झोपण्याचा सल्ला देत आहे.