दोन चेहऱ्याच्या Cute मांजरीचा सोशल मीडियात धुमाकूळ, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रश्नात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 12:55 IST2020-02-26T12:55:02+5:302020-02-26T12:55:47+5:30
आश्चर्याची बाब म्हणजे मांजरीच्या चेहऱ्याचा रंग तर वेगळा आहेच, सोबतच तिच्या डोळ्यांचा रंगही वेगवेगळा आहे. एका डोळा भुऱ्या रंगाच तर एक निळ्या रंगाचा आहे.

दोन चेहऱ्याच्या Cute मांजरीचा सोशल मीडियात धुमाकूळ, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रश्नात!
सोशल मीडियात मांजरींचे कितीतरी क्यूट फोटो व्हायरल होत असतात. लोकांना ते पसंतही पडतात. कारण हे फोटो पाहून त्यांना जरा वेळ का होईना आपल्या बिझी लाइफमध्ये आनंद मिळतो. त्यामुळेच कितीतरी मांजरींचे प्रोफाइलही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतात.
दरम्यान सध्या एका मांजरीचे फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या मांजरीचा चेहरा दोन रंगांचा आहे. म्हणजे अर्धा चेहरा वेगळ्या रंगाचा आणि डोळेही वेगवेगळ्या रंगाचे.
Quimera असं या मांजरीचं नाव असून तिचे फोटो पाहून लोक थक्क झाले आहेत. ही मांजर अर्जेंटिनातील असून जगभरात तिच्या फोटोंना पसंती मिळत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे मांजरीच्या चेहऱ्याचा रंग तर वेगळा आहेच, सोबतच तिच्या डोळ्यांचा रंगही वेगवेगळा आहे. एका डोळा भुऱ्या रंगाच तर एक निळ्या रंगाचा आहे.
याला Chimerism असं म्हटलं जातं. या आजारात जनावरांचा रंगच बदलतो. मुळात या मांजरीवर अनेक रंग आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रंग. कंबरेच्या खालच्या भागात तर तिचा डार्क ब्लू रंग आहे.
Quimera चं इन्स्टाग्रामवर अकाउंट असून तिचे ९१ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टावरील लोक तिला Two Faced Cat म्हणजे दोन चेहऱ्यांची मांजर असं म्हणतात.