शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
2
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
3
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
4
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
5
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
6
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
7
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
8
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
9
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
10
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
11
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
12
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
13
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
14
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
15
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
16
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
17
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
18
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
19
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
20
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप

आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 11:15 IST

Indonesian Marriage Viral Story: ७४ वर्षीय नवरदेवाने आपल्या २४ वर्षीय नवरीला हुंडा म्हणून चक्क ३ अब्ज रुपये (इंडोनेशियन) दिले

जकार्ता : प्रेम, पैसा आणि वादांनी भरलेली एक आगळीवेगळी विवाह कहाणी सध्या इंडोनेशियामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ७४ वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीने त्याच्यापेक्षा तब्बल ५० वर्षांनी लहान असलेल्या, २४ वर्षांच्या तरुणीशी लग्नगाठ बांधली आहे. पण या लग्नापेक्षा जास्त चर्चा आहे, ती वराने वधूला दिलेल्या कोट्यवधींच्या हुंड्याची आणि फसवणुकीची.

इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतातील पचितान रीजन्सी येथे १ ऑक्टोबर रोजी हा विवाह संपन्न झाला. ७४ वर्षीय नवरदेवाने आपल्या २४ वर्षीय नवरीला हुंडा म्हणून चक्क ३ अब्ज रुपये (इंडोनेशियन) दिले, ज्याचे भारतीय चलनात मूल्य सुमारे १ कोटी ५९ लाख रुपये (₹ १.६ कोटी) आहे.

हुंड्याच्या रकमेवर वादसुरुवातीला हुंड्याची रक्कम १ अब्ज रुपये ( भारतीय ₹ ५३ लाख) ठरली होती, पण लग्नाच्या वेळी ती अचानक वाढवण्यात आली. तसेच, लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही प्रत्येकी १,००,००० इंडोनेशिअन रुपये रोख भेट देण्यात आले. या भव्य सोहळ्यामुळे या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मात्र, त्यानंतर या विवाहाला वादाचे वळण लागले.

फोटोग्राफरची तक्रार आणि अफवांचे पीकलग्न झाल्यानंतर लगेचच, वधू-वरांनी पैसे न देताच विवाहस्थळ सोडले आणि त्यांनी संपर्क तोडला, अशी सार्वजनिक तक्रार वेडिंग फोटोग्राफी कंपनीने केली. यानंतर सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे.

काही लोकांनी हुंड्यापोटी दिलेला ३ अब्ज रुपयांचा चेक बनावट असल्याचा दावा केला. वराने वधूच्या कुटुंबाची मोटरसायकल घेऊन पळ काढल्याची अफवा पसरली.

सत्य काय?फोटोग्राफरच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, वराने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी हा विवाह खरा असून, दिलेला हुंडा देखील खराच असल्याचे सांगितले. हुंड्याची मोठी रक्कम त्यांनी बँक सेंट्रल एशियातून कर्ज घेतल्याचे सांगितले. वधूच्या कुटुंबीयांनीही या जोडप्याने लग्न केले असून ते सध्या हनीमूनवर असल्याचे स्पष्ट केले.

वधूच्या एका नातेवाईकाने सांगितले की, मुलीला या वृद्धाशी लग्न न करण्याची ताकीद दिली होती, पण तिने ऐकले नाही. आता मात्र या लग्नावरून मोठा गदारोळ माजला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indonesia: 74-year-old marries 24-year-old, dowry disputes and rumors erupt.

Web Summary : An Indonesian wedding between a 74-year-old man and a 24-year-old woman sparked controversy over a large dowry, initially rumored to be fake. The wedding photographer complained of non-payment, fueling further speculation. While the groom claims the dowry is legitimate, police are investigating the claims of fraud.
टॅग्स :Indonesiaइंडोनेशियाmarriageलग्न