शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

Viral Video: सिंहाशी मस्ती करत होता, हिंस्त्र प्राण्याने बोटच जबड्यात पकडून खेचून काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:54 IST

आफ्रिकन प्राणीसंग्रहालयातील असाच एक व्हिडिओ (Horrifying Video of Lion Attack) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने थेट सिंहासोबत मस्ती करायला सुरुवात केली आणि काहीच वेळात त्याला त्याची किंमत चुकवावी लागली.

सिंह दुरून दिसला तरी आपली वाट बदलून तिथून निघून जाणंच योग्य असतं, असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर हा प्राणी पिंजऱ्याच्या आत असला तरीही त्याच्यापासून सावध राहाणं अतिशय गरजेचं आहे. मात्र ज्यांना ही गोष्ट समजत नाही, त्यांना त्याचे भयंकर परिणामही भोगावे लागतात. आफ्रिकन प्राणीसंग्रहालयातील असाच एक व्हिडिओ (Horrifying Video of Lion Attack) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने थेट सिंहासोबत मस्ती करायला सुरुवात केली आणि काहीच वेळात त्याला त्याची किंमत चुकवावी लागली (Lion Ripped Off Man’s Finger).

थरकाप उडवणारा हा व्हिडिओ जमायकाच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे, जो इथे फिरण्यासाठी आला असावा. सर्वजण सिंहासोबत त्याचे फोटो घेत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. मात्र तो करत असलेली मस्ती कदाचित सिंहाला अजिबातही आवडली नाही. यानंतर या व्यक्तीसोबत जे काही घडलं, ते एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्याबाहेर उभा असल्याचं दिसतं आणि पिंजऱ्याच्या आतून सिंह त्याला पाहत आहे. सिंहाला इतक्या जवळून पाहूनही या व्यक्तीचं समाधान होत नाही आणि तो पिंजऱ्याच्या आतमध्ये बोटं घालून सिंहासोबत खेळू लागतो. ही गोष्टी जंगलाच्या राजाला अजिबातही आवडत नाही. सुरुवातीला तो काहीच करत नाही, पण थोड्या वेळाने रागावलेला सिंह या व्यक्तीची बोटं आपल्या जबड्यात पकडतो. यानंतर मात्र या व्यक्तीला घामच फुटतो. खूप प्रयत्नानंतर तो आपला हात सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढण्याच यशस्वी ठरतो. मात्र यात त्याच्या हाताच्या बोटाची हाडंच वाचली आणि मांस सिंहाने ओढून खाल्लं

@OneciaG नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एका यूजरने हा भयानक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने व्हिडिओसोबत जमायकन म्हणही लिहिली आहे. यात त्याने म्हटलं की, दिखावा करण्याच्या नादात अपमानच होतो. हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यापासून आतापर्यंत 3.6 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. यावर हजारो लोकांनी कमेंट करत या व्यक्तीच्या मूर्खपणावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर