VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत होता तरूण आणि त्याने हल्ला केला मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:59 IST2022-08-16T16:58:56+5:302022-08-16T16:59:23+5:30

Snake Viral Video: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक व्यक्ती सापाला छेडतो आणि कोब्राला हातात पकडण्याचा प्रयत्न करतो. याचाच सापाला राग येतो आणि तो व्यक्तीवर हल्ला करतो.

Man try to catch dangerous king cobra attacked watch what happened next | VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत होता तरूण आणि त्याने हल्ला केला मग...

VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत होता तरूण आणि त्याने हल्ला केला मग...

Snake Viral Video:  सोशल मीडियावर नेहमीच काही खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जो बघून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडीओत एक व्यक्ती कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच लोकांना सापांचे वेगवेगळे व्हिडीओ आवडतात. जर तुम्हीही त्या लोकांपैकी असाल तर तुम्हालाही हा व्हिडीओ आवडेल. या व्हिडीओत सापाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला सापाने चांगलीच शिक्षा दिली आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक व्यक्ती सापाला छेडतो आणि कोब्राला हातात पकडण्याचा प्रयत्न करतो. याचाच सापाला राग येतो आणि तो व्यक्तीवर हल्ला करतो. आधी तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेला हा व्हिडीओ बघा.

या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं की, तो वाचला नाही तर किंग कोब्राच्या हल्ल्यात तो काही सेकंदात जागीच ठार झाला असता. अर्थातच किंग कोब्राच्या या हल्ल्यानंतर व्यक्ती घामाघुम झाला असेल. त्यामुळे यापुढे तो कोणत्याही सापाला पकडण्याआधी दहा वेळा विचार करेल. अनेकदा लोक अशा जीवांना छेडतात आणि जीवही संतापलेले असता. ज्याची मोठी किंमत लोकांना चुकवावी लागते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये लोक वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत.

Web Title: Man try to catch dangerous king cobra attacked watch what happened next