मुलाने वाढवली ५ इंच लांब नखे, त्यांवर खर्च इतका करतो जेवढा एखाद्याचा पगारही नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:27 IST2024-11-20T16:18:24+5:302024-11-20T16:27:49+5:30
या मुलाने मुलींसारखी नखे वाढवली आहेत आणि नखे सेट करण्यासाठी तो नेहमीच पार्लरमध्ये जात असतो.

मुलाने वाढवली ५ इंच लांब नखे, त्यांवर खर्च इतका करतो जेवढा एखाद्याचा पगारही नसेल!
एखादी फॅशन फॉलो करणं आणि स्टायलीश दिसणं सगळ्यांनाच आवडतं. मात्र, सामान्यपणे असा समज असतो की, मुलीच जास्त फॅशन करतात. पण ही धारणा तोडण्याचं काम अमेरिकेतील एका मुलाने केलं आहे.
या मुलाने मुलींसारखी नखे वाढवली आहेत आणि नखे सेट करण्यासाठी तो नेहमीच पार्लरमध्ये जात असतो. पार्लरमध्ये जाऊन केवळ नखांवर तो इतका खर्च करतो, जेवढं एखाद्या सामान्य माणसाच्या घराचं भाडं देखील नसेल. या मुलाचा नखांवरील खर्च वाचाल तर तुम्हीही हैराण व्हाल.
मिरर वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, २५ वर्षीय रायन न्यूयॉर्कमध्ये राहतो. त्याला नखं वाढवण्याची इतकी आवड आहे की, त्याने हाताच्या बोटांची नखे ५ इंच लांब वाढवली आहे. या नखांचं मॅनीक्योर करण्यासाठी तो प्रत्येक वेळी ७५ हजार रूपये खर्च करतो. रायन आपल्या नखांवर जेम्स, ३डी पॅटर्न आणि ग्लिटर लावून ते सजवले आहेत.