अंकल रॉक्स! 'मौत का कुआं'मध्ये बुलेट सुसाट, काकांचा अंदाज पाहून थक्क झाले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:50 IST2025-01-18T16:49:33+5:302025-01-18T16:50:08+5:30
Trending video: पूर्वी अनेक सिनेमांमध्ये 'मौत का कुआं' दाखवला जात होता. एका गोल विहिरीसारख्या खड्ड्यात लाकडांच्या किंवा मातीच्या भिंतींवर गाड्या गोल फिरवल्या जातात.

अंकल रॉक्स! 'मौत का कुआं'मध्ये बुलेट सुसाट, काकांचा अंदाज पाहून थक्क झाले लोक!
Trending video: 'मौत का कुआं' आजकाल कमी बघायला मिळतात. काही ग्रामीण भागांमधील जत्रांमध्ये हे 'मौत के कुएं' लोकांसाठी मोठं आकर्षण ठरतात. हा खेळ बघायला जेवढा मजेदार असतो, तेवढाच खतरनाकही असतो. एक छोटीशी चूक इथे जीवाशी खेळ ठरू शकते. पूर्वी अनेक सिनेमांमध्ये 'मौत का कुआं' दाखवला जात होता. एका गोल विहिरीसारख्या खड्ड्यात लाकडांच्या किंवा मातीच्या भिंतींवर गाड्या गोल फिरवल्या जातात.
सध्या 'मौत का कुआं'असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती यात बुलेट वेगानं पळवताना दिसत आहे. या व्यक्तीनं ज्या पद्धतीने बुलेट चालवली ते बघून लोक थक्क झाले आहेत.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक वयस्कर व्यक्ती 'मौत का कुआं'मध्ये सुसाट बुलेट फिरवत आहे. त्यांचा बुलेट चालवण्याचा अंदाजही वाखण्याजोगा आहे. काही वेळ ते बुलेट फिरवतात आणि नंतर तेवढ्याच चपळाईनं बाहेर पडतात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @_9_o_d_d_y_ नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या रोमांचक व्हिडिओला आतापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १७ लाख लोकांनी लाइक केलं आहे. तर लोक यावर भरभरून प्रतिक्रिया देत व्यक्तीचं कौतुक करत आहेत. अनेकांनी या व्यक्तीचं इतकं वय असूनही केलेल्या हिंमतीला दाद दिली आहे.