Man proposed girlfriend on 3000 feet hight between two cliffs photo goes viral | जमिनीपासून ३ हजार फूट उंचीवर जाऊन त्याने गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज आणि.....
जमिनीपासून ३ हजार फूट उंचीवर जाऊन त्याने गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज आणि.....

(Image Credit : dailymail.co.uk)

प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पार्टनरला वेगळ्या अंदाजात प्रपोज करायचं असतं. जेणेकरून आयुष्यभर तो क्षण त्यांच्या लक्षात रहावा. तरूण मंडळी अनेकदा त्यांच्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावतात. अशाच एका आगळ्या-वेगळ्या प्रपोजचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

(Image Credit : dailymail.co.uk)

क्रिश्चियन रिचर्ड्सने जमिनीपासून ३ हजार फूट उंचीवर असलेल्या एका भव्य दगडावर जाऊन त्याच्या गर्लफ्रेन्डला प्रपोज केलं. हे ठिकाण नॉर्वेमध्ये असून इथे जाऊन त्याने तिला प्रपोज केलं. आता तुम्ही अंदाज लावू शकता की, इतक्या सुंदर आणि रोमॅंटिक ठिकाणी त्याने प्रपोज केल्यावर तिची काय प्रतिक्रिया राहिली असेल. रिचर्ड्सची गर्लफ्रेन्ड बेक्स मोर्ले ही हा नजारा पाहून फारच इमोशनल झाली होती. 

(Image Credit : dailymail.co.uk)

जेव्हा रिचर्ड्सने जमिनीपासून ३ हजार फूट उंचीवर गुडघ्यावर बसून त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा बेक्सच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तिने लगेच त्याला लग्नाला होकार दिला. बेक्सला हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. या वेगळ्या प्रपोजचा फोटो सोशल मीडियात सध्या व्हायरल झाला आहे.

रिचर्ड्सने 'द सन' सोबत बोलताना सांगितले की, अनेक लोकांना वाटत होतं की, बेक्स प्रपोजल नाकारेल. पण मला वेगळ्याच गोष्टीची चिंता सतावत होती. मला भीती होती की, माझ्या हातून रिंग खाली पडू नये. कारण ती खाली पडली असती तर मी शोधू शकलो नसतो.

हे जरा भीतीदायक नक्कीच होतं, पण माझ्यापेक्षा जास्त चिंतेत बेक्स होती. तिला चिंता होती, ती तेथून खाली पडू नये. तिने लगेच होकार दिला, पण मला वाटलं होतं की, तेथून लवकर खाली उतरण्यासाठी म्हणून तिने घाईने होकार दिला असेल. पण तसं नव्हतं तिने मनापासून होकार दिला. त्याने सांगितले की, दोघे नॉर्वेला एका ट्रेकिंग ट्रिपला गेले होते, तेव्हा त्याला ही प्रपोज करण्याची आयडिया सुचली.


Web Title: Man proposed girlfriend on 3000 feet hight between two cliffs photo goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.