बोंबला! ...आणि म्हणून पठ्ठ्याने चक्क किचनमध्ये पार्क केली कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 13:12 IST2019-09-06T13:08:24+5:302019-09-06T13:12:50+5:30
प्रत्येक व्यक्ती आपल्या गाडीची योग्य ती काळजी घेत असतात. अनेकजण तर कार किंवा बाइकला आपल्या अपत्याप्रमाणे जपतात.

बोंबला! ...आणि म्हणून पठ्ठ्याने चक्क किचनमध्ये पार्क केली कार!
प्रत्येक व्यक्ती आपल्या गाडीची योग्य ती काळजी घेत असतात. अनेकजण तर कार किंवा बाइकला आपल्या अपत्याप्रमाणे जपतात. गाडी काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपायही केले जातात. मात्र, एका व्यक्तीची अशाच एका गोष्टी कारणाने चांगलीच चर्चा रंगली आहे. पॅट्रिक आणि जेसिका हे दोघे फ्लोरिडात राहतात. हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला होता की, भयंकर वादळ येणार आहे. गॅरेजमध्ये जेसिकाची कार आधीच पार्क केलेली होती. त्यामुळे पॅट्रिकला त्याच्या कारची चिंता लागली. आणि त्याने कार थेट किचनमध्ये आणून पार्क केली.
झालं असं की, या घटनेला सुरूवात झाली होती एक पैजेने. पॅट्रिक आणि जेसिका यांच्यात पैज लागली होती. जेसिका म्हणाली होती की, 'तुझी कार किचनमध्ये पार्क होणार नाही'. पॅट्रिक म्हणाला, मी पार्क करून दाखवणार.
त्यानंतर धडपड करत पॅट्रिकने कार किचनमध्ये पार्क केली. याचे फोटो जेसिकाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेत. पॅट्रिकच्या या अजब कारनाम्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.