दोन खतरनाक अजगर खांद्यावर घेऊन त्याने केलं असं काही, बघा थक्क करणारा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:03 IST2022-04-29T18:01:40+5:302022-04-29T18:03:20+5:30
Man Dance With Dangerous Pythons: हा व्हिडीओ यावर संपतो असं नाही. दोन अजगर खांद्यावर घेऊन ही व्यक्ती असं काही करू लागते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

दोन खतरनाक अजगर खांद्यावर घेऊन त्याने केलं असं काही, बघा थक्क करणारा व्हिडीओ
Man Dance With Dangerous Pythons: साप दुरून दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. जर विशाल अजगराबाबत सांगायचं तर ते मनुष्यांसोबत प्राण्यांनाही जिवंत गिळतात. त्यामुळेच अजगरांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. याउलट सोशल मीडियावर अलिकडे एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती दोन अजगरांना खांद्यावर घेऊन दिसत आहे.
हा व्हिडीओ यावर संपतो असं नाही. दोन अजगर खांद्यावर घेऊन ही व्यक्ती असं काही करू लागते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दोन अजगर खांद्यावर घेऊन ही व्यक्ती डान्स करू लागते. व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणत आहेत की, हा मूर्खपणा आहे. लोक म्हणत आहे की, व्हिडीओ बनवण्याच्या नादात या व्यक्तीने इतका धोका पत्करला.
व्हिडीओ बघून तुम्हीही चक्रावून जाल. बघू शकता की, एक व्यक्ती दोन विशाल अजगर खांद्यावर उलचून आहे आणि डान्स करू लागतो. या व्यक्तीने तोडांवर मास्क लावलेला आहे. त्याने डोक्यावर टोपीही घातली आहे. अजगरांना खांद्यावर घेऊन डान्स करतानाचा हा व्हिडीओ खरंच थक्क करणारा आहे.
हा व्हिडीओ ज्यांनी ज्यांनी पाहिला ते व्यक्तीला मूर्ख म्हणत आहेत. कारण व्यक्ती यात दोन खतरनाक अजगरांसोबत खेळताना दिसत आहे. असा नजारा नेहमी बघायला मिळत नाही. हा व्हिडीओ world_of_snakes नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्या आला आहे.