VIDEO : गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये सुरू होता रोमान्स, पत्नीने रंगेहात पकडलं; पती अंडरविअरमध्येच खिडकीतून बाहेर आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:25 IST2025-12-22T15:19:30+5:302025-12-22T15:25:29+5:30
Viral News : एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. चीनच्या हांगझोउ शहरातून एक असाच व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO : गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये सुरू होता रोमान्स, पत्नीने रंगेहात पकडलं; पती अंडरविअरमध्येच खिडकीतून बाहेर आला
China Viral Video: पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत जर कुणी आपल्या गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं आणि अचानक पत्नी सुद्धा घरी पोहोचली तर काय होईल याचा अंदाज आपण लावूच शकता. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी कधी तर पत्नी पतीला थेट हॉटेलमध्ये रंगेहात पकडल्याच्या घटनाही घडत असतात. चीनच्या हांगझोउ शहरातून एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झालेत, हसताहेत आणि यावर चर्चाही करत आहेत. असं सांगण्यात येत आहे की, एका विवाहित पुरूषाला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलच्या रूममध्ये रंगेहाथ पकडलं. स्थिती इतकी बिघडली की, व्यक्तीला दरवाजातून बाहेर पडण्याऐवजी खिडकीतून पळ काढावा लागला. हैराण करणारी बाब म्हणजे यावेळी व्यक्तीच्या अंगावर केवळ अंडरविअर होती. तो चौथ्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर आला.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्यक्ती हॉटेल रूमच्या खिडकीतून बाहेर पडून खाली लावलेल्या साइन बोर्डला धरतो. ही घटना चीनच्या बॉयू अपार्टमेंट नावाच्या हॉटेलमधील असल्याचं सांगण्यात येतंय. चौथ्या मजल्यावर अशाप्रकार लटकून राहणं जीवघेणं ठरलं असतं, पण तो बराच वेळ साइन बोर्डच्या आधारानं लटकून होता. लोक खालून हा नजारा बघून थक्क झालेत.
Moment ‘secret lover’ dangles from hotel sign in boxers after ‘window escape' pic.twitter.com/01cTGUncHu
— The Sun (@TheSun) December 18, 2025
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला असून १.२ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. लोक या घटनेवर आणि व्यक्तीच्या कारनाम्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी याला एखाद्या सिनेमातील सीन म्हटलं तर काही या घटनेला नात्यांवरील उडत चाललेल्या विश्वासाचं उदाहरण म्हटलं.
सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेट्स करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, दगा द्यायचाच होता तर इतकी भीती कशाला, पळून जायची काय गरज होती. तर दुसऱ्याने लिहिलं की, तो या स्थिती तिथपर्यंत पोहोचला तरी कसा. तर एका यूजरने लिहिलं की, साइडबोर्ड इतकं मजबूत होतं हे सगळ्यात आश्चर्याचं आहे. नाही तर तो पडलाच असता.