कुत्र्यांना वाचवण्याच्या नादात व्यक्तीला कांगारूकडून खाव्या लागल्या लाथा-बुक्क्या, बघा थरारक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:53 IST2022-02-26T14:52:46+5:302022-02-26T14:53:19+5:30
Viral Video : यात एक मनुष्य कांगारूसारख्या शक्तिशाली प्राण्यासोबत फाइट करत आहे. कांगारू आपल्या खतरनाक भांडणांसाठी आणि क्रूर भांडणांसाठी फेमस आहे. ते विरोधकासोबत फाइट करतात.

कुत्र्यांना वाचवण्याच्या नादात व्यक्तीला कांगारूकडून खाव्या लागल्या लाथा-बुक्क्या, बघा थरारक व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच काही जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ बघून हसू येतं तर काही व्हिडीओ बघून त्यातील गोष्टींवर विश्वास बसत नाही. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. कारण यात एक मनुष्य कांगारूसारख्या शक्तिशाली प्राण्यासोबत फाइट करत आहे. कांगारू आपल्या खतरनाक भांडणांसाठी आणि क्रूर भांडणांसाठी फेमस आहे. ते विरोधकासोबत फाइट करतात.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की एका कांगारूने मोकळ्या मैदानात असलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला. या व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्यांना या कांगारूपासून वाचवण्यासाठी त्याच्यासोबत फाइट केली. व्हिडीओतून असं दिसतं की व्यक्ती आपल्या परिवारासोबत आणि पाळिव कुत्र्यांसोबत जंगलात फिरायला गेला होता. तेव्हा त्याचा सामना कांगारूसोबत झाला. यावेळी आपल्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी व्यक्ती कांगारूसोबत फाइट करू लागतो. हा सगळा नजारा परिवारातील एका महिलेने मोबाइलमध्ये शूट केला.
हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटव अपलोड करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'व्यक्ती आपल्या कुत्र्यांना कांगारूपासून वाचवण्याचा प्रयत्न केला'. आतापर्यंत या व्हिडीओला ३६०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत.