बेडवर झोपून मोबाइल चार्ज करण्याची होती सवय, जे झालं ते पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:51 PM2022-01-05T17:51:52+5:302022-01-05T17:54:49+5:30

मोबाइल फोन आज आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हीही असंच करत असाल तर ही चिंतेची बाब आहे.

Man had habit of charging the mobile while lying on the bed know what happened | बेडवर झोपून मोबाइल चार्ज करण्याची होती सवय, जे झालं ते पाहून बसेल धक्का

बेडवर झोपून मोबाइल चार्ज करण्याची होती सवय, जे झालं ते पाहून बसेल धक्का

Next

बरेच लोक मोबाइल फोन चार्जिंगवर लावून वापर करतात. अनेक लोक असेही आहेत जे बेडवर  पडल्या पडल्या मोबाइल चार्जिंगला लावतात. अनेकांच्या चार्जिंग पिनच्या केबलचं प्लास्टिक निघालेलं असतं. तरीही ते न बदलता लोक त्याचाच वापर करतात. मोबाइल फोन आज आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हीही असंच करत असाल तर ही चिंतेची बाब आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल. फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, वायर तुटलेल्या चार्जरने मोबाइल चार्ज करण्याच्या सवयीने चादरीचं कशाप्रकारे नुकसान झालं. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही गादीवर बसून फोन चार्ज करत असता. हे फोटो ऑस्ट्रेलियाच्या फायर डिपार्टमेंटने फेसबुकवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, एका पांढऱ्या रंगाच्या चादरीवर मोबाइलचा चार्जिंगचा केबल पडला आहे. केबल फारच जळालेला दिसत आहे. बेडवर बेडशीट चार्जिंग केबलने जळालेली दिसत आहे. विचार करा की, जर या कपड्यांऐवजी शरीराच्या एखाद्या भागावर असं झालं तर काय होईल? या चार्जरच्या जळाल्याने केबलची प्रोटेक्टिंग कोटिंग पूर्णपणे निघाली होती. ज्यामुळे चादरीवर जळाल्याचे निशाण दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फायर डिपार्टमेंटने फोटो शेअर करत लिहिलं की, 'या ख्रिसमसला तुमच्या मुलांनाही तुम्ही टॅबलेट किंवा फोन गिफ्ट केलाय?' त्यांनी पुढे लिहिलं की, 'असं असेल तर हे सुनिश्चित करा की, मुलं बेडवर लेटून मोबाइल चार्जरचा वापर करणार नाहीत'. आपल्या मुलांना निर्देशांचं पालन करायला शिकवा. 
 

Web Title: Man had habit of charging the mobile while lying on the bed know what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.