VIDEO : व्यक्तीला सापडलं जमिनीखाली गाडलेलं मडकं, उघडताच बाहेर आला साप आणि बेडूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:17 IST2024-11-02T13:09:44+5:302024-11-02T13:17:56+5:30
Viral Video : एका व्यक्तीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात जमिनीखाली गाडलेलं धन त्याला सापडतं. एका मडक्यात त्याला ते सापडतं.

VIDEO : व्यक्तीला सापडलं जमिनीखाली गाडलेलं मडकं, उघडताच बाहेर आला साप आणि बेडूक...
Viral Video : खजिना सापडणं ही एक फार आश्चर्याची बाब असते. सोशल मीडियावर खजिना सापडल्याचे आणि त्यातून अनेक अवाक् करणाऱ्या गोष्टी बाहेर आल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी जमिनीखाली गाडलेल्या जुन्या मडक्यांमध्ये सोन्या-चांदीची नाणी सापडतात तर कधी दागिने. यासोबत मडक्यांमध्ये अशा काही गोष्टी निघतात त्या बघून धक्काही बसतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात जमिनीखाली गाडलेलं धन त्याला सापडतं. एका मडक्यात त्याला ते सापडतं. मात्र, सोबतच मडक्यातून एक साप आणि बेडुकही निघतो.
इन्स्टाग्राम अकाउंट @altindefineavcisi वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एक व्यक्ती जमीन खोदताना दिसत आहे. असे जमिनीखाली गाडलेलं धन शोधण्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. पण ते कितपत खरे असतात याची पुष्टी आम्ही करत नाही किंवा ते खरे असण्याचा दावाही आम्ही करत नाही.
जुन्या काळात बॅंकेची सुविधा नव्हता. अशात लोक त्यांच्याकडील महागड्या वस्तू कुठेतरी लपून ठेवत होते. जास्तीत जास्त लोक जमिनीखाली या गोष्टी गाडून ठेवत होते. पण जर ते गाडणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं तर त्या महागड्या तशाच जमिनीखाली राहून जातात.
नंतर अनेक वर्षांनी जेव्हा त्या ठिकाणी खोदकाम केलं गेलं तर गाडलेलं धन समोर येतं. असाच या व्यक्तीला एके ठिकाणी जमिनीखाली गाडलेलं धन सापडलं. त्याला सापडलेल्या या मडक्यातून साप आणि बेडुकही बाहेर आलं. जे सगळ्यांना अवाक् करणारं आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने यावर कमेंट केली की, "हा व्हिडीओ फेक आहे". दुसऱ्याने लिहिलं की, "जर मडकं वरून पॅक होतं तर मग त्यात साप आणि बेडूक कुठून आला?". अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोक करत आहेत.