अनेकदा कोणालाही पडताना किंवा रस्त्यावर घसरताना पाहिलं की खूप वाईट वाटतं. त्या माणसाला किती वेदना होत असतील याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. कधी कधी पाहणाऱ्यालाच आपले डोळे बंद करावे लागतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर येत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओ केवळ ६ सेंकदाचा आहे. पण व्हिडीओ पाहताच काळजाचा ठोका मात्र चुकतो.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हातातला दुधाचा कॅन सांडल्यामुळे हा माणूस जमिनीवर जोरात आदळला आहे. या माणसाच्या पुढे एक महिला काहीतरी सामान घेऊन जात असते. त्यानंतर या माणसाच्या हातातील कॅनमधून आपोआप दूध बाहेर पडू लागतं. याच दुधावर पाय पडल्यानं या माणूस घसरून जोरात पडतो आणि नंतर लगेचच उठण्याचा प्रयत्नही करतो. हा व्हिडीओ पाहून त्या माणसाच्या डोक्याला किती जोरात लागलं असेल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुदैवानं या माणसाला गंभीर दुखापत झालेली नाही, असं लोक म्हणत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आठशेपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......