आज्जीसमोर तरूणाने कपडे फाडून केला अजब डान्स, लोक म्हणाले - भावा, तुला करायचं काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:49 IST2024-06-11T15:42:38+5:302024-06-11T15:49:54+5:30
Funny Viral Video : घराच्या अंगणात एका खाटेवर एक वृद्ध महिला बसली आहे. तर तरूण मागे असलेल्या एका पोत्यातून बाहेर येतो आणि महिलेच्या डोक्यावरून उडी मारतो.

आज्जीसमोर तरूणाने कपडे फाडून केला अजब डान्स, लोक म्हणाले - भावा, तुला करायचं काय आहे?
Funny Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अजब अजब व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मजेदार असतात तर काही डोकं चक्रावून सोडतात. लोक फेमस होण्यासाठी आजकाल काहीही करतात हे बघायला मिळतं. असंच काहीसं या तरूणाबाबतही म्हणता येईल. पण याला नेमकं करायचं काय होतं? असाही प्रश्न तुम्हाला पडेल. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.
पाकिस्तानच्या एका गावातील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातं. तुम्ही बघू शकता की, घराच्या अंगणात एका खाटेवर एक वृद्ध महिला बसली आहे. तर तरूण मागे असलेल्या एका पोत्यातून बाहेर येतो आणि महिलेच्या डोक्यावरून उडी मारतो. समोर आल्यावर तो स्वत:चे कपडे फाडतो आणि कोका-कोलाच्या बॉटलमधील कोल्ड ड्रिंक स्वत:च्या डोक्यावर ओतून घेतो. त्यानंतरही तो बरचं काही करतो. पण कळायला अजिबात मार्ग राहत नाही की, त्याला काय दाखवायचं आहे किंवा काय करायचं आहे.
पुढे हा तरूण नाचचा नाचता थांबतो आणि खाटेच्या मागे जाऊन तिथे पडलेला कापड घेऊन येतो. यावेळीही तो महिलेच्या डोक्यावरून उडी मारून येतो. कापड जमिनीवर टाकून आदळउपट करतो. आता हा व्हिडीओ बघितल्यावर डोकं चक्रावणार नाही तर काय होईल? एका यूजरने लिहिलं की, "डॉक्टर काय म्हणाले, कधी बरा होईल हा?".
या व्हिडीओवर लोक अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "तुला नेमकं करायचं काय आहे?". तर दुसऱ्याने लिहिलं की, "याला लगेच डॉक्टरांकडे न्या". काही लोकांनी महिलेबाबत चिंता व्यक्त केली.