Man catch crocodile in hook horrifying video goes viral | Video : बापरे! मासे पकडण्यासाठी नदीत टाकलं जाळं, गळाला लागली मगर, अन् मग.....

Video : बापरे! मासे पकडण्यासाठी नदीत टाकलं जाळं, गळाला लागली मगर, अन् मग.....

मगर हे नाव कानी पडलं तरी भीतीने अंगावर काटे येतात. अनेकांनी मगर ही फक्त सिनेमात पाहिलेली असते. प्रत्यक्षात मगर दिसण्याचा काही संबंध येत नाही. पण अचानकपणे समोर  मगरीसारखा प्राणी आला तर काय होईल? असा विचार तुम्ही कधी केलाय का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियामधील एका माणसाबरोबर हा भीतीदायक प्रकार घडलाय. बोटीत बसून मासे पकडत असताना अचानक त्या माणसाच्या जाळ्यात मगर अडकली.

ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन शहराजवळ मासेमारीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे  मासेमारीसाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात. गेल्या सोमवारी त्याच ठिकाणी ट्रेंट डी हा माणूस आपल्या कुटूंबासह बोटींग आणि मासेमारीचा आनंद घेण्यासाठी गेला होता. नदीचे पाणी गढूळ असल्यामुळे मासे नीट दिसत नव्हते. तरीपण ट्रेंटने मासे पकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. विशेष म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा संपूर्ण कुटुंब बोटीतच बसले होते. Video: बाबो! ही असली कसली हौस,‘या’ साडीच्या दुकानातल्या गर्दीने कोरोनाच जाईल पळून

अचानक जाळं जड झाल्याचं जाणवले, म्हणून त्याने लगेचच जाळं बाहेर काढलं. मोठा मासा गळाला लागला असावा म्हणून कुंटुबिय आनंदीत झाले. पण जाळ्यातून अचानक मगर पाहून सर्वजण अवाक् झाले.  मगर जाळ्यात अडकल्यामुळे तिला बाहेर काढणार कसे असा प्रश्न होता. ट्रेंटनं जाळं काढण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. अखेर मगरीनेच जीव वाचवण्यासाठी ते ट्रेंटच्या हातातलं जाळं कुडतडून टाकलं. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "सौंदर्यवान पत्नी हवी", उद्योगपतीनं जाहिरात दिली, अन् एका चुकीमुळे नेटिझन्सनी उडवली खिल्ली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Man catch crocodile in hook horrifying video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.