Man carrying motorcycle on head and put on bus video viral netizens said real bahubali | बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...

बापरे! डोक्यावर भलीमोठी बाईक घेतली अन् एका झटक्यात बसवर चढला; व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले...

सध्या सोशल मीडियावर एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस एखादी पेटी उचलावी तसं सहज भलीमोठी बाईक उचलत आहे. सिनेमांमध्ये तुम्ही अशा प्रकारची फायटींग अनेकदा पाहिली असेल. ग्राफिक्सच्या वापरानं वेगवेगळ्या प्रकारचे अवघड स्टंट हिरोने केलेले पाहायला मिळतात. पण  खरेखुरे स्टंट क्वचित पाहायला मिळतात. डोक्यावर एक भलीमोठी बाईक  घेऊन जात असलेल्या एका रिअल बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भलीमोठी बाईक आपल्या डोक्यावर घेतली आहे. इतकंच नव्हे कर तर तो ती बाईक घेऊन बसवरही चढला आहे. हा व्हिडीओ पाहून  सगळेचजण अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही पण तब्बल  १४० किलोची बाईक डोक्यावर  घेतली आहे. वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीवेळासाठी तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. तब्बल  १४० किलोंची ही बाईक असून एव्हढी मोठी बाईक डोक्यावर घेऊन चालत आहे. या माणसाची शरीरयष्टी फारशी प्रभावी नाही तरीही त्यानं हा पराक्रम केला आहे. हा प्रकार पाहून नेटिझन्स अवाक् झाले आहेत. एकदा बाईक उचलल्यानंतर कुठेही न थांबता या माणसानं जिना चढत बसच्या टपापर्यंत बाईक नेऊन ठेवली आहे. 

हा प्रकार करताना ना त्याचा हात किंवा ना त्याचा पाय थरथरत आहे. अगदी एखादी साधी पेटी उचलावी तसं त्यानं त्या बाईकला उचलल्याचं दिसतं आहे. आतापर्यंत  २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून  १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Man carrying motorcycle on head and put on bus video viral netizens said real bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.