भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:50 IST2025-04-17T10:47:58+5:302025-04-17T10:50:00+5:30

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती भल्यामोट्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.

Man bathing with giant python in the bathtub goes viral, Watch Video | भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल? याचा काही नेम नाही. मात्र, यावेळी समोर आलेल्या एका व्हिडिओने सर्व मर्यादा ओलांडल्या आहे, जो पाहून नेटकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओत एक व्यक्ती भल्यामोठ्या अजगरासह बाथ टबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करू शकतात? त्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती भलोठ्या अजगरासह बाथटबमध्ये बसलेला दिसत आहे. तसेच न घाबरता अजगराला आपल्या अंगावर खेळवत आहे. हा अजगर १० फूट लांब असल्याचे बोलले जात आहे.

therealtarzann या नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटमधून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो जो आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी पाहिला आहे. बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. तर, अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'एक वेगळा आंघोळीचा अनुभव' असे लिहिले आहे.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'अरे भाऊ, कशाला स्वत:चा जीव धोक्यात टाकतो.' दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'हा अजगर मुलीपेक्षा सुंदर आहे.' आणखी एका वापरकर्त्याने असे म्हटले आहे की, 'मी देखील माझ्या अजगराला दररोज अंघोळ घालतो.'

Web Title: Man bathing with giant python in the bathtub goes viral, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.