Man and lion friendship video shows that you can build a strong bond with an animal | Video : तो झाडाजवळ बसला होता, दबक्या पावलांनी मागून येत होता सिंह आणि.....
Video : तो झाडाजवळ बसला होता, दबक्या पावलांनी मागून येत होता सिंह आणि.....

सोशल मीडियात सिंहाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात सिंह झाडामागे लपलेल्या व्यक्तीकडे झेप घेतो. पण अचानक ती व्यक्तीला सिंहाला जवळ घेते. केवळ २० सेकंदाच्या व्हिडीओने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. म्हणजे बघा ना हा व्हिडीओ आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय तर ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि कितीतरी रिट्वीट मिळाले आहेत.

हा व्हिडीओ @aarondinglek नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिलंय की, 'याने माझा दिवस चांगला केलाय'.

या व्हिडीओत एक व्यक्ती झाडाच्या मागे बसली आहे. तेव्हाच अचानक सिंह दबक्या पावलांनी आणि नंतर वेगाने झेप घेतो. ही व्यक्ती सांगते की, सिंहाला वाटतंय की, तो येत असल्याचं मला माहीत नाही. इतक्यात सिंहा त्याच्यावर झेप घेतो. पण नंतर व्यक्ती त्याला जवळ घेते. काही मिनिटात सिंह तिथून जातो. 

हा व्हिडीओ पाहून अनेकांना असं वाटतं की, आता सिंह त्या व्यक्तीवर झेप घेणार आणि सगळं संपणार. पण असं काही होत नाही. कारण ती व्यक्ती सिंहासोबत खेळत होती. व्हिडीओतील व्यक्ती अनेक वर्षांपासून जंगली प्राण्यांची काळजी घेण्यासाठी एक संस्था चालवते.


Web Title: Man and lion friendship video shows that you can build a strong bond with an animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.