६१ वर्षीय मलेशिअन व्यक्तीनं १५ तासात पूर्ण केली २२५ किलोमीटरची ट्रायथलॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:49 IST2025-02-25T12:49:18+5:302025-02-25T12:49:49+5:30

Viral News :व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलानं त्याच्या वडिलांना दाखवलं आहे. ज्यांनी २०० किलोमीटरच्या स्वीमिंग, सायकलिंग आणि रनिंग स्पर्धेत विजय मिळवला.

Malaysian 61 year old dad complete 225km triathlon 15 hours | ६१ वर्षीय मलेशिअन व्यक्तीनं १५ तासात पूर्ण केली २२५ किलोमीटरची ट्रायथलॉन

६१ वर्षीय मलेशिअन व्यक्तीनं १५ तासात पूर्ण केली २२५ किलोमीटरची ट्रायथलॉन

Viral News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर सध्या एका मलेशिअन व्यक्तीची चांगली चर्चा सुरू आहे. या व्यक्तीच्या मुलानं केदाहच्या लॅंगकावीमध्ये आयोजित आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या आपल्या ६१ वर्षीय वडिलांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यानं या वयातही त्याच्या वडिलांनी किती मोठं यश मिळवलं हे सांगितलं आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलानं त्याच्या वडिलांना दाखवलं आहे. ज्यांनी २०० किलोमीटरच्या स्वीमिंग, सायकलिंग आणि रनिंग स्पर्धेत विजय मिळवला. हकीमनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मी तुमच्याकडून एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात कधीही हार मानू नये. वय केवळ एक संख्या आहे".

ताजुद्दीन मुस्तफा ज्यांना ट्रायहल्क नावानं ओखळलं जातं. त्यांनी एका बेटाच्या चारही बाजूनं १८० किलोमीटरची सायकलिंग करण्याआधी पेंटाई कोकमध्ये ३.९ किलोमीटरची स्वीमिंग आणि नंतर रनिंगही केलं. या ६१ वर्षीय व्यक्तीनं दिवसा सुरू होऊन रात्री संपणारी ४२ किलोमीटरची रनिंग स्पर्धा पूर्ण केली.

व्हिडिओमध्ये शेवटची ३ किलोमीटरची रनिंग करताना त्याना दाखवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे  या ६१ वर्षीय व्यक्तीनं १५ तास आणि ५४ मिनिटांची रनिंग पूर्ण केली.

ताजुद्दीन यांनी सांगितलं की, ते एक बॅंकर होते जे गेल्यावर्षी सेवानिृत्त झालेत. ते म्हणाले की, ते १९८३ पासून वेगवेगळ्या मॅरेथॉन, स्पार्टन रनिंग, स्विमथॉन आणि ट्रायथलॉनमध्ये भाग घेत आहेत. ते १९९६ मध्ये स्वीमिंग शिकले, त्यानंतर २००७ मध्ये ट्रायलथॉनमध्ये भाग घेणं सुरू केलं आणि तोपर्यंत ते मोकळ्या पाण्यात स्वीमिंग करण्यात एक्सपर्ट झाले होते. ते आता स्वीमिंगमध्ये इतके परफेक्ट झाले की, त्यांनी १३ स्विमथॉनमध्ये भाग घेतला.

ते म्हणाले की, "मला थायलॅंडमध्ये मॅरोथॉनमध्ये भाग घेणं आवडतं. कारण आयोजक चांगले आहेत. मला हायब्रिड ट्रेनिंग नावाचं एकप्रकारचं वेट ट्रेनिंगही पसंत आहे".

Web Title: Malaysian 61 year old dad complete 225km triathlon 15 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.