लय भारी! तेलुगू सुपरस्टारच्या ३ वर्षाच्या लेकीनं म्हटली मराठी आरती; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 08:56 PM2020-09-08T20:56:07+5:302020-09-08T21:01:17+5:30

सध्या नम्रतानं शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Mahesh babu and namrata shirodkar daughter sing marathi aarti Video viral | लय भारी! तेलुगू सुपरस्टारच्या ३ वर्षाच्या लेकीनं म्हटली मराठी आरती; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! तेलुगू सुपरस्टारच्या ३ वर्षाच्या लेकीनं म्हटली मराठी आरती; पाहा व्हायरल व्हिडीओ

Next

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि तितकंच सगळ्याच्या आवडीचे कपल आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या पोस्टला भन्नाट प्रतिसाद मिळत असतो. नम्रता त्यांच्या मुलांचे व्हिडीओ, फोटो नेहमी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सध्या नम्रतानं शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नम्रतानं आपल्या ३ वर्षाच्याा चिमुरडीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  यामध्ये चक्क ती मराठी आरती म्हणत आहे. आपल्या गोंडस, मधूर आवाजात 'दुर्गे दुर्गट भारी' आरती म्हणणाऱ्या सिताराचे तिच्या नम्रताला देखील खूप कौतुक वाटत आहे. नम्रताने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, ''गणपतीच्या आरत्या माहिती आहेत आणि जे गातात त्यांच्यासाठीहा सिताराचा प्रामाणिक प्रयत्न'' सितारा लहान असल्यामुळे तिला या आरतीचा भावार्थ समजत नसला तरी ऐकून सितारानं ही आरती म्हटली आहे. 

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. You are the best', अशा म्हणत नम्रतानं  सिताराचे कौतुक केले आहे.  या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून प्रेक्षकांनी या व्हिडीओला तुफान पसंती दर्शवली आहे. सोशल मीडिया युजर्सनी ती खूपच क्यूट असल्याचे म्हटले आहे. दरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. अनेकांनी हे आवडतं कुटुंब असल्याचे म्हटले आहे. 

हे पण वाचा-

नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण

शाब्बास पोरा! १० वी च्या पोरानं भंगारापासून बनवली भन्नाट बाईक; नेटिझन्सना आठवलं पबजी....

Web Title: Mahesh babu and namrata shirodkar daughter sing marathi aarti Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.